गुहागर : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन, राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर, रत्नागिरी जिल्हा संपर्क अध्यक्ष अनिल खानविलकर, गुहागर तालुका अध्यक्ष विनोद जानवळकर, प्रमोद गांधी यांच्या नेतृत्वाखाली पालशेत व निगंडुळ गावातील तरुणांनी मनसे मध्ये प्रवेश केला.
On the occasion of Independence Day Youths from Palshet and Nigandul villages enter MNS under the leadership of MNS Guhagar taluka president Vinod Janwalkar
गुहागर तालुक्यातील चिखली जनसंपर्क कार्यालय येथे पक्षप्रवेशचा कार्यक्रम पार पडला. यावेळी तालुकाध्यक्ष विनोद जाणवळकर, प्रमोद गांधी, मयुरी महेश शिगवण, संजय भुवड, दिनेश निवाते, प्रसाद विखारे, कौस्तुभ कोपरकर, निलेश गमरे, आदित्य मुकनाक आदी उपस्थित होते.
यावेळी मनसेच्या नवनियुक्त पदाधिकारी यांची निवड करण्यात आली. तेजस कणगुटकर – पालशेत शाखा अध्यक्ष, हरेश पटेकर – पालशेत उपशाखा अध्यक्ष, अनिकेत भुवड – निगुंडळ उपशाखा अध्यक्ष, तुषार शिरकर – निगुंडळ गट अध्यक्ष यांचा समावेश आहे. तसेच तनिष पाटील, शरद पालशेतकर, आकेश तांडेल, हरेश पटेकर, तेजस कणगुटकर, अजित आग्रे, योगेश पाटील, तुषार शिरकर, अनिकेत भुवड, अक्षय भागवत, समर्थ केंबळे, संदीप केंबळे, अनिरुद्ध भुवड, उमेश शिगवण आदींनी मनसेमध्ये प्रवेश केला.