महर्षी परशुराम अभियांत्रिकीचा उपक्रम, जिल्हातील 4900 सहभागी
गुहागर, ता. 30 : अभियांत्रिकीच्या शिक्षक व विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान वर्धित शिक्षणावर राष्ट्रीय कार्यक्रम (National Programme on Technology Enhanced Learning) या संस्थेची आणि त्यांच्या विविध ऑनलाइन अभ्यासक्रमांची माहिती व्हावी. (Workshop on NPTEL) या उद्देश्याने परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्युत अभियांत्रिकी विभागाने कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेला जिल्ह्यातील शिक्षक आणि विद्यार्थी मिळून 4 हजार 900 जण सहभागी झाले होते.
What is NPTEL
भारतातील अभियांत्रिकी शिक्षणाच्या विकासासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगलोरसह मुंबई, दिल्ली, कानपूर, खरगपूर, चेन्नई, गुवाहाटी आणि रुरकी येथी भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) यांनी 2003 मध्ये नॅशनल प्रोग्राम ऑन टेक्नॉलॉजी इन्हान्स्ड लर्निन (तंत्रज्ञान वर्धित शिक्षणावर राष्ट्रीय कार्यक्रम तंत्रज्ञान वर्धित शिक्षणावर राष्ट्रीय कार्यक्रम – एनपीटीइएल) या संस्थेची स्थापना केली. आजपर्यंत या संस्थेने स्थापत्य, संगणकशास्त्र आणि अभियांत्रिकी, इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक्स व टेलीकम्युनिकेशन आणि यांत्रिक या अभ्यासक्रमाविषयी सुमारे 835 ऑनलाइन आणि व्हिडिओ कोर्सेस विकसीत केले आहेत. अभियांत्रिकी क्षेत्रातील सर्वांनी या कोर्सेचा अभ्यास करावा. अशी अपेक्षा आहे.
The National Programme on Technology Enhanced Learning (NPTEL) was initiated by seven Indian Institutes of Technology (Bombay, Delhi, Kanpur, Kharagpur, Madras, Guwahati and Roorkee) along with the Indian Institute of Science, Bangalore in 2003. Five core disciplines were identified, namely, civil engineering, computer science and engineering, electrical engineering, electronics and communication engineering and mechanical engineering and 835 courses in web/video format were developed in this phase.
एनपीटीइएलच्या (Workshop on NPTEL) या कार्याची माहिती कोकणातील अभियांत्रिकी आणि विज्ञान क्षेत्रातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांना व्हावी. म्हणून महर्षी परशुरामच्या विद्युत अभियांत्रिकी विभाग व शासकीय मोतीलाल विज्ञान महाविद्यालय, भोपाळ यांनी आयआयटी मद्रासच्या सहकार्याने आयोजित केला होता. आयआयटी खरगपूरमधील शिब शंकर दास हे प्रमुख व्याख्याते होते. प्रा. दास IIT खरगपूर इथे २०१६ सालापासून नेटवर्क अभियंता म्हणून कार्यरत आहेत. तसेच NPTEL उपक्रमांशी संबंधित आहेत.
Workshop on NPTEL
महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्युत विभागाचे प्रमुख सतिश घोरपडे यांनी सर्वांचे स्वागत केले. कार्यशाळेची Workshop on NPTEL थोडक्यात माहिती दिली. त्यानंतर श्री.दास यांनी NPTEL च्या ऑनलाइन अभ्यासक्रमांची थोडक्यात ओळख करून दिली. NPTEL वरील विविध विषयांवरील आणि अभ्यासक्रमांवरील व्हिडिओ आणि नोट्स कसे लाभदायक ठरतात. एनपीटीईएल साइटवर नोंदणी कशी करावी. त्यातील लोकल चॅप्टर्स, फॅकल्टी मेंटर्स, लॅब वर्क, विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप, GATE सपोर्ट आणि डोमेन प्रमाणपत्र, ऑनलाईन परीक्षा प्रक्रिया आदी गोष्टी कशापध्दतीने वापरायच्या याची इत्यंभूत दिली. . याव्यतिरिक्त IIT तर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या विविध इंटर्नशिपबद्दलही श्री. दास यांनी खूप छान माहिती दिली. Workshop on NPTEL
या कार्यशाळेमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील 4 हजार 900 जणांनी सहभाग नोंदवला. यामध्ये जिल्ह्यातील कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालये, पदवी आणि पदविका अभियांत्रिकीचे विद्यार्थी व प्राध्यापकांचा समावेश होता. प्रस्तुत अभिनव कार्यशाळेच्या यशस्वीततेकरिता विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय बेडेकर आणि महर्षी परशुराम महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. अविनाश पवार यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. Workshop on NPTEL