• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पडवे गावात कोट्यावधीच्या पेयजल योजनेचे काम रखडले

by Ganesh Dhanawade
October 7, 2020
in Old News
16 0
1
पडवे गावात कोट्यावधीच्या पेयजल योजनेचे काम रखडले
32
SHARES
91
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

ग्रामीण पाणी पुरवठा विभाग व ठेकेदाराचा मनमानी कारभार; ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

गुहागर : तालुक्यातील पडवे येथे पेयजल योजनेअंतर्गत १ कोटी ८० लाख रुपये अंदाजपत्रकीय पाणी योजना मंजूर झाली. मात्र, विविध कारणांमुळे ही पाणी योजना आजपर्यंत पूर्णत्वास आले नाही. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व संबंधित ठेकेदार यांच्या मनमानी कारभाराबाबत येथील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जोपर्यंत या योजनेचे स्ट्रक्चरल ऑडिट व काम पूर्ण होईपर्यंत ठेकेदारास कोणत्याही प्रकारचे बिल अदा करण्यात येऊ नयेत, अशी मागणी जि. प. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे करण्यात आली आहे. तसे न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
तालुक्‍यातील तीव्र पाणीटंचाई भेडसावणारे गाव म्हणजे पडवे. कायमस्वरूपी असणारी पाणीटंचाई दूर करण्यासाठी ग्रामस्थांच्या व ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार सन १०१४/ १५ मध्ये पेयजल योजनेअंतर्गत १ कोटी ८० लाख रुपये अंदाजपत्रके पाणी योजना मंजूर झाली. मात्र, विविध कारणांमुळे ही पाणी योजना आजपर्यंत पूर्णत्वास आली नाही. पाणी योजनेचे काम मिळाल्यानंतर ठेकेदाराने अतिशय धीम्या गतीने कामास सुरुवात केली. कालांतराने ठेकेदार नियोजित जागी काम करत नसल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. योजनेच्या विहिरी करता सर्वे नंबर २०/१३ या क्षेत्रांमध्ये बक्षीसपत्र जि. प. च्या नावे होऊन तशी सातबारा सदरी नोंद असताना विहिरीची बांधणी सर्वे नंबर २०/१४ मध्ये करण्यात आली. विहिरी नजिक बांधलेला बंधारा चुकीच्या ठिकाणी बांधल्यामुळे बंधार्‍याच्या बाजूचा भाग धुपून जाऊन शेतजमिनीचे नुकसान झाले. हे काम करत असताना काताळे गावाच्या हद्दीतील प्राचीन सोमनाथ मंदिराच्या कंपाउंडची नासधूस झाली तर मुर्त्यांचे विटंबन झाले आहे.
तसेच बँकेच्या ताब्यातील जप्त प्रॉपर्टी मधून विनापरवाना रस्ता नेण्यात आला आहे. त्याची समजही बँकेकडून ग्रामपंचायतीला मिळाली आहे. तर पाण्याची पाईपलाईन जाणाऱ्या जमीन मालकांची आज पर्यंत परवानगी घेण्यात आली नाही. पाणीपुरवठा विभाग गुहागर यांना पत्रव्यवहार करून या योजनेचे इस्टीमेंट, प्रशासकीय मान्यतेचे पत्र, मंजूर रक्कम, कार्यारंभ आदेश, पाण्याचे इलटेस्ट रिपोर्ट, सुधारित मान्यता या बाबत विचारणा केली असता सदरची माहिती माहितीच्या अधिकारात मागून घ्या अशी उद्धट उत्तरे ग्रामस्थांना मिळाली. यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांनी योजनेचे काम मार्गी लावण्यासाठी चाललेल्या मनमानी कारभाराबाबत ग्रामस्थांनी गेले वर्षभर संबंधितांकडे पत्र व्यवहार केला. त्यानुसार अधिकाऱ्यांनी गावाला प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी तक्रारदारांशी चर्चा केली व योजनेचे ठेकेदार वर्धा प्रोजेक्ट यांना तक्रारदारांच्या शंकेचे निरसन होईपर्यंत पाणी योजनेचे काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

Tags: GuhagarGuhagar NewsMarathi NewsNews in Guhagarग्रामीण पाणी पुरवठा योजनाग्रामीण पाणीपुरवठा विभागजि.प. ग्रामीण पाणीपुरवठा विभागटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युजसोमनाथ मंदिर
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.