• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शौचालयाच्या टाकीत पडून महिलेचा मृत्यू

by Mayuresh Patnakar
January 16, 2022
in Guhagar
16 0
0
शौचालयाच्या टाकीत पडून महिलेचा मृत्यू
31
SHARES
89
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

वरवेलीतील घटना, आईला भेटायला माहेरी आली होती

गुहागर,  ता. 16 : तालुक्यातील वरवेली आगरेवाडी येथे  मनाली विजय भागडे (वय ४२), कडाप्पा तुटल्याने  शौचालयाच्या टाकीत  पडली. त्यावेळी डोक्याला गंभीर इजा झाल्याने तिचा जागीच  मृत्यू  झाला. ही घटना शनिवारी (15 जानेवारी) सायंकाळी घडली. सौ. मनाली वरवेलीला आजारी आईला भेटायला आली होती. (Woman dies after falling into toilet tank)

सौ. मनाली (सासर – वहाळ ता. चिपळूण, जि. रत्नागिरी)  सध्या मुंबईत रहात होती. तिचे माहेर वरवेली आगरे वाडी असून माहेरचे नाव शुभांगी आगरे आहे.  तिची आई गंभीर आजारी असून अंथरुणाला खिळली आहे. तिला भेटण्यासाठी सौ. मनाली भागडे दोन दिवसांपूर्वी वरवेलीला आली होती.  घराच्या परसावात  शौचालयाच्या टाकी शेजारी सौ. मनाली कचरा काढण्याचे काम करत होती.  कचरा काढताना त्या नकळत शौचालयाच्या टाकीवर गेल्या त्याचवेळी टाकीवरील कडाप्पा तूटला आणि मनाली तोल जावून शौचालयाच्या टाकीत पडली. (Woman dies after falling into toilet tank)

आगरे यांच्या घराशेजारी मयत झाल्याने अनेक मंडळी येथे जमली होती. शौचालयाच्या टाकीत कोणीतरी पडल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी तिकडे धाव घेतली. मनालीला बाहेर काढले.  त्यावेळी तिच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून नाकातून रक्तस्त्राव होत होता. ती बेशुद्ध झाल्याचे लक्षात आले. तातडीने ग्रामस्थांनी तिला डॉक्टरांकडे नेले. मात्र डॉक्टरांनी मनालीचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. (Woman dies after falling into toilet tank)

या घटनेची माहिती रविंद्र रामचंद्र आगरे वय ४६, रा. वरवेली यांनी गुहागर पोलीस ठाण्यात याची दिली आहे. अधिक तपास गुहागर पोलीस ठाण्याचे सहाय्यक  पोलीस फौजदार आनंदराव पवार करित आहेत. (Woman dies after falling into toilet tank)

Tags: Breaking NewsGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsLocal NewsMarathi NewsNews in GuhagarTop newsWoman dies after falling into toilet tankगुहागर न्यूजगुहागरच्या बातम्याताज्या बातम्यामराठी बातम्यास्थानिक बातम्या
Share12SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.