मनसे तालुकाध्यक्ष विनोद जानवळकर यांचा प्रशासनाला सवाल
गुहागर : गुहागर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने पाटपन्हाळे येथील ग्रामपंचायत सभागृहात संपन्न झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमावर गुहागर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर मग तळवली येथे झालेल्या कार्यक्रमाला तालुका प्रशासनातील सर्व अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत मोठी गर्दी केली असतानाही त्यांच्या कारवाई का नाही, कोरोनाचे नियम फक्त ‘मनसे’लाच का, असा खडा सवाल मनसेचे तालुकाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी तहसीलदारांना केला आहे. तळवलीच्या कार्यक्रमात उपस्थितांच्या तोंडाला मास्क पण नव्हते, असे जानवळकर यांनी सांगितले.
The event held at Talwali was attended by a large crowd in the presence of all the officials and people’s representatives of the taluka administration Why not their action,MNS taluka president Vinod Janwalkar has asked the tehsildar why the corona rules are only for MNS.
गुहागर तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून गेली दोन वर्षे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. ऐवढेच नव्हे तर कोरोना काळात तालुक्यातील जनतेसाठी सक्रियपणे काम करणारा मनसे पक्ष होता. कोणतेहि शासकीय काम चुकीच्या पद्धतीने होत असेल त्याठिकाणी आवाज उठवण्याचे काम मनसे कार्यकर्ते करत आहेत. पक्षाच्या या सामाजिक कार्यामुळे तालुक्यातील शेकडो तरुण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पक्ष प्रवेश करताना दिसत आहेत. असाच पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम नुकताच पाटपन्हाळे ग्रामपंचायत सभागृहात पार पडला. या कार्यक्रमात सुमारे पन्नास कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेल्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे गुहागर पोलिसांचे मत असल्याने आयोजक मनसे तालुकाध्यक्ष विनोद जानवळकर यांच्यावर 130/ 2021 भादंवि कलम 269 अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला.
आ भास्करशेठ जाधव यांच्या प्रयत्नाने तळवली प्राथमिक आरोग्य केंद्र येथे युनिसेफ व प्रथम या संस्थांच्या माध्यमातुन माता बालस्नेही प्राथमिक आरोग्य केंद्र उपक्रमाचे उद्घाटन नुकतेच तहसिलदार प्रतिभा वराळे, सभापती पूर्वी निमूणकर, गटविकास अधिकारी श्री. भोसले, उपसभापती सीताराम ठोंबरे, अन्य पंचायत समितीचे सदस्य व वैद्यकिय अधिकारी यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमात नागरिकांची मोठी गर्दी होती. काहींच्या तोंडाला मास्कही नव्हते. एकीकडे कोरोनाच्या नियमांचे सर्वसामान्य जनतेला धडे द्यायचे आणि दुसऱ्या बाजूला आपणच कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून कार्यक्रम घ्यायचे, असा आरोप मनसे तालुकाध्यक्ष जानवळकर यांनी केला. तसेच सोशल डिस्टंसिचे नियम फक्त मनसेला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची तालुक्यात पक्ष वाढीची होत असलेली घोडदौड पाहून इतर राजकीय पक्षांना याची भीती वाटत असल्याने त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर गुन्हे दाखल करायला भाग पाडले असावेत, असे तालुकाध्यक्ष जानवळकर म्हणाले.