रत्नागिरी : राज्यात कोरोना विषाणुचा(Corona virus) प्रसार व प्रादुर्भाव यामध्ये वाढ झालेली असून ओमिक्रॉन व्हेरीयंटमुळे(Omicron variant) अधिक धोका निर्माण झालेला आहे. या कारणास्तव शासनाने आदेशामध्ये अंशत: बदल करुन सुधारीत निर्बंध लावले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात Level-3 चे निर्बंध लागू करण्यात आले होते. सदरच्या निर्बंधानुसार जिल्ह्यात आठवडा बाजार(Weekly market) सुरु करण्याबाबत कोणतेही निर्देश देण्यात आले नव्हते .आठवडा बाजार सुरु करण्याबाबत निर्बंध(Restrictions) कायम होते. त्यानंतर शासनाकडील वेळोवेळीच्या आदेशानुसार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यादृष्टीने काही निर्बंध शिथील करण्यात आले होते. तर काही निर्बंध वाढविण्यात आले होते. राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार व प्रादुर्भाव यामध्ये वाढ झालेली असून ओमिक्रॉन व्हेरीयंटमुळे अधिक धोका निर्माण झालेला आहे. त्या धर्तीवर शासनाने अतिरिक्त निर्बंध लागू केलेले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रसार व प्रादुर्भाव यामध्ये वाढ होऊ नये व ओमिक्रॉन व्हेरीयंटचा प्रसार होऊ नये याकरीता अधिकची काळजी म्हणून काही निर्बंध लावणे आवश्यक असल्याने सदयस्थितीत रत्नागिरी जिल्ह्यातील काही ठिकाणी कोणतीही पुर्व परवानगी न घेता आठवडी बाजार सुरु केलेची बाब जिल्हा प्रशासनाच्या(District Administration) निदर्शनास आली आहे. ही अतिशय गंभीर बाब असल्याचे जिल्हाधिकारी डाॅ. बी.एन पाटील(Collector Dr. B.N. Patil) यानी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.
जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन(District Disaster Management) त्याअर्थी, डॉ.बी.एन. प्राधिकरण, रत्नागिरी यानी साथरोग अधिनियम 1897 आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रसार व प्रादुर्भाव यामध्ये वाढ होऊ नये व ओमिक्रॉन व्हेरीयंटच्या प्रसारास प्रतिबंध करणेसाठी रत्नागिरी जिल्ह्यात सुरु असलेले आठवडा बाजार पुढील आदेशापर्यंत या आदेशान्वये बंद करण्यात येत असल्याचे आदेश जारी केला आहे.
याकामी शहरी भागात अंमलबजावणी होते आहे अगर कसे? याबाबत सर्व मुख्याधिकारी यांनी कार्यवाही करणेची आहे. तर ग्रामीण भागात अंमलबजावणी होते आहे अगर कसे? याबाबत सर्व गटविकास अधिकारी(Group Development Officer) यांनी कार्यवाही करणेची आहे. यापूर्वी संदर्भीय आदेशान्वये वेळोवेळी निर्गमित केलेले कोराना निबंध आदेश / मार्गदर्शक सूचना व निर्बंध पुढील आदेशापर्यंत लागू राहतील. कोविड-19 च्या प्रतिबंधासाठी या कार्यालयाव्दारे वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांचे मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 तसेच भारतीय दंड संहितेचे कलम 188 नुसार अन्य कायदेशीर तरतुदीनुसार कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहील.असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.