• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
28 October 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

35 वर्षांच्या जलसंघर्षाला मिळणार पूर्णविराम

by Mayuresh Patnakar
January 31, 2022
in Guhagar
18 0
1
Water Scheme Sanctioned for Dhopave

Water Scheme Sanctioned for Dhopave

35
SHARES
101
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आमदार जाधव यांचे प्रयत्न : धोपावेसाठी ५.५० कोटींची पाणी योजना मंजूर

गुहागर, ता. 31 : अनेक वर्षांची पाणीटंचाई. अनेक उपायांना येणारे अपयश. त्यातून हतबल झालेले प्रशासन. दरवर्षी पाणी विकत घेण्यासाठी लोकांसमोर पसरावे लागणारे हात. या सर्वांमधुन धोपावेकरांना मुक्ती देण्याचे काम आमदार भास्कर जाधव यांनी केले. धोपावे गावासाठी 18 किलोमिटर दूर असलेल्या मोडकाआगर धरणातून पाणी देण्यासाठी 5 कोटी 50 लाखांची नळपाणी योजना मंजूर करुन आणली. Water Scheme Sanctioned for Dhopave मंजूरीचे पत्र आमदार जाधव यांच्याकडून घेताना धोपावे ग्रामस्थांच्या मनात होते फक्त आनंदाश्रु.

दाभोळ खाडीलगत वसलेल्या धोपावे गावातील 6 वाड्यांना दरवर्षी पाणी टंचाईला सामारे जावे लागत असे. 35 वर्ष येथील ग्रामस्थ पाण्यासाठी संघर्ष करीत होते. येथील तरुणांनी गावासाठी डोंगरमाथ्यावर श्रमदानाने शेत तळे खोदले. त्याचा उपयोग झाला नाही. शासनाच्या माध्यमातूनही अनेक प्रयत्न झाले. जलयुक्त शिवारमधुन बंधारे झाले. उर्जामंत्र्यांनी प्रकाशगडमध्ये ग्रामस्थांसोबत चर्चा करुन आरजीपीपीएलच्या जलवाहीनीवरुन धोपाव्यासाठी स्वतंत्र जलवाहीनीला परवानगी दिली. परंतू विविध तांत्रिक समस्यांमुळे पाण्याचा प्रश्र्न कायम होता. पाण्यासाठी उपोषणे झाली.  2019च्या लोकसभा निवडणुकीवर 6 वाड्यांनी बहिष्कार टाकला. तरीही पाणी प्रश्र्न सुटला नाही. धोपावेतील उद्योजक राजन दळी यांच्या नेतृत्त्वाखाली दरवर्षी स्थानिक तरुणांचे मंडळ देणगी जमवून उन्हाळ्यात टँकरची व्यवस्था करत असे. घरातील जेवण शिजवण्यापासून जीवनाच्या सर्व गरजा भागविण्यासाठी हे तरुण रक्ताचे पाणी करत होते. Water Scheme Sanctioned for Dhopave

धोपावेतील पाणी टंचाईचे संग्रहीत फोटो

Water Scheme Sanctioned for Dhopave

आमदार भास्कर जाधव 2009 मध्ये या मतदारसंघातून निवडून आले तेव्हापासून येथील पाण्याचा प्रश्र्न मार्गी लागावा म्हणून प्रयत्नरत होते. विविध प्रयोगांमधील अपयशानंतर त्यानंतर आमदार श्री. जाधव हे संबंधित विभागाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना  घेवून  गावात गेले आणि सर्व ग्रामस्थ, महिला यांच्याशी संवाद साधून पाण्याचा प्रश्न अधिक सखोलपणे समजून घेतला. त्याचवेळेस येत्या दोन वर्षात पाणी योजना मंजूर करेन, असा शब्द त्यांनी दिला होता.
अखेर गावापासून 18 कि.मी. दूर असलेल्या मोडकाआगर धरणातून गावाला पाणी पुरवठा करण्याशिवाय पर्याय नाही. हे नक्की झाले. योजना खर्चिक आहे. नळ पाणी पुरवठा योजनेचा खर्च गावकऱ्यांना पेलवणारा नव्हता. त्यामुळे शासनाकडून विशेष बाब म्हणून ही योजना मंजूर होणे आवश्यक होते. त्यासाठी गेल्या दोन  वर्षात त्यांनी शासन पातळीवर प्रचंड संघर्ष केला. विधानसभेत विविध आयुधांच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या अथक प्रयत्नांती शासनाकडून तब्बल ५.५० कोटी रूपये मंजूर करून घेण्यात त्यांना यश आले. Water Scheme Sanctioned for Dhopave या विशेष अशा पाणी योजनेच्या मंजुरीचा शासन निर्णयसुध्दा निघाला.

धोपावेतील पाणी टंचाईचे संग्रहीत फोटो

धोपावेची पाणी योजना मंजूर झाल्याचा अधिकृत शासन निर्णय प्राप्त झाल्यानंतर आमदार जाधव यांनी आज गावातील प्रमुख मंडळींना बोलावून घेतले. मंजुरीचा शासन निर्णयही उपस्थित असलेल्या श्री. परशुराम पालशेतकर, शिवशंकर  पाटील, नीलेश जाधव, सुधाकर भडसावळे, संदीप पवार, अनंत डावल, निवृत्ती गुढेकर, सुनील  शिंदे, मोहन गुढेकर, सुधाकर नाटेकर, अमोल निमकर आदींच्या आनंदाला पारावार राहिला नाही. ते पुन्हा पुन्हा आमदार श्री. जाधव यांचे आभार मानत होते. ‘साहेब, दिलेला शब्द तुम्ही पाळलात, आम्ही आयुष्यभर आपले ऋण विसरणार नाही’, असे उत्फूर्त उद्गार ग्रामस्थांच्या तोंडून निघाले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख सचिन बाईत, गुहागरच्या सभापती पूर्वी निमूनकर, उपसभापती सीताराम ठोंबरे, जिल्हा परिषद सदस्य महेश नाटेकर, विनायक मुळे, फैसल कासकर आदी उपस्थित होते.

Tags: GuhagarGuhagar NewsLatest NewsMarathi NewsWater Scheme Sanctioned for Dhopaveटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.