आ. जाधवांच्या उपस्थितीत नव्या नळपाणी योजनेच्या आराखड्याबाबत बैठक
गुहागर : पाटपन्हाळे ग्रामपंचायत हद्दीतील काही भागात उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवत असते. ही समस्या दूर करण्यासाठी आमदार भास्कर जाधव यांच्या माध्यमातून आणि सरपंच संजय पवार यांच्या पाठपुराव्याने शुक्रवार दि. 3 डिसेंबर रोजी दुपारी 3 वा. पाटपन्हाळे ग्रामपंचायत सभागृहात जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत पाणी योजनेचा कृती आराखडा तयार करण्याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
In some parts of Patpanhale Gram Panchayat, water scarcity is felt in summer.To solve this problem, through MLA Bhaskar Jadhav and Sarpanch Sanjay Pawar. December 3 at 3 p.m. A meeting has been organized at Patpanhale Gram Panchayat Hall to prepare action plan of water scheme under Jaljivan Mission program.
गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे ग्रामपंचायत ही मध्यवर्ती आणि सर्वात जास्त उत्पन्न देणारी ग्रामपंचायत म्हणून ओळखले जाते. ग्रामपंचायत क्षेत्राचा विस्तार झपाट्याने वाढत आहे. नवनवीन गृहप्रकल्प आणि व्यवसाय वाढू लागले आहेत. पर्यायाने लोकवस्तीही वाढत चालली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस भेडसावू लागले आहे. 20 वर्षापूर्वी एक कोटी रुपये खर्चून पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नळपाणी योजना राबवली गेली होती. परंतु, ही योजना नियोजनाअभावी आणि निकृष्ट कामामुळे तीन महिन्यातच बंद पडली. त्यानंतर या भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली. या परिस्थितीवर मात करण्यासाठी कार्यतत्पर सरपंच संजय पवार यांनी नागरिकांची गैरसोय दूर व्हावी या उद्देशाने 12 लाख रुपये खर्चून बंद अवस्थेत असलेल्या नळपाणी योजनेची दुरुस्ती करून पाणी शृंगारतळी येथील विहिरीत आणले. तसेच टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला. पाण्याची समस्या कायमस्वरूपी दूर व्हावी याकरिता सरपंच श्री. पवार यांनी आमदार भास्कर जाधव यांच्याकडे मोठ्या नळपाणी योजनेची मागणी केली. त्यानुसार आ. जाधव यांनी पुढाकार घेत जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत नळपाणी योजनेचा कृती आराखडा तयार करण्यासाठी या बैठकीचे आयोजन केले. याबद्दल सरपंच संजय पवार यांनी आ. जाधव यांचे आभार मानले आहेत.
या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, सभापती पूर्वी निमुणकर, उपसभापती सिताराम ठोंबरे, संबंधित पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी ग्रामपंचायत हद्दीतील सर्व ग्रामस्थांनी या बैठकीला उपस्थित रहावे, असे आवाहन सरपंच संजय पवार यांनी केले आहे.