Vote for tableau of Maharashtra 2022
गुहागर न्यूजच्या सर्व वाचकांना नमस्कार
ही बातमी नाही तर विनंती आहे. यावर्षी प्रजासत्ताक दिनाला (Republic Day) दिल्लीच्या राजपथावर झालेल्या संचालनामधील कोणत्या गोष्टी आपल्याला आवडल्या याचे मत केंद्र सरकारने मागवले आहे. Vote for tableau of Maharashtra 2022 आपण दिलेल्या मतांनंतर केंद्र सरकार संचालनामधील सर्वोत्कृष्ट चित्ररथाची निवड करणार आहे. तरी आपण सर्वांनी महाराष्ट्र सरकारच्या जैवविविधेची ओळख करुन देणाऱ्या चित्ररथाला मत द्यावे. Vote for tableau of Maharashtra 2022 अशी आमची विनंती आहे. माहिती तळाशी असलेला व्हिडिओ देखील पहा.
लक्षात ठेवा मतदान (Vote for tableau of Maharashtra 2022) करायला फक्त 31 जानेवारी 2022 रोजी रात्री 11.45 पर्यंतच वेळ आहे.
जाणून घ्या काय आहे महाराष्ट्राचा चित्ररथ
यंदाच्या संचलनात ‘महाराष्ट्रातील जैवविविधता मानके’ या विषयावर आधारित चित्ररथ सहभागी झाला. त्यामध्ये साताऱ्यातील ‘कास’ पठार दाखवण्यात आले होते. कास पठारावरील सुमारे १५ प्राणी आणि २२ वनस्पती आणि फुले यांचा समावेश त्यामध्ये होता. या चित्ररथासाठी झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश देणारे गीत प्रसिध्द गायक सुदेश भोसले यांनी गायले आहे. (या माहितीच्या तळाशी आपल्याला राजपथावरील संपूर्ण कार्यक्रमाचा व्हिडिओ पहाता येईल. त्यामध्ये 2:21:13 या वेळेवर महाराष्ट्राचा चित्र रथ आहे.) Vote for tableau of Maharashtra 2022
Vote for tableau of Maharashtra 2022
कसे द्याल महाराष्ट्राच्या चित्ररथाला मत
तत्पूर्वी ही माहिती संपूर्ण वाचा. जेणेकरुन तुम्हाला मत नोंदवणे सोपे जाईल.
- महाराष्ट्राच्या चित्ररथाला मत देण्यासाठी आपल्या खालील लिंकवर क्लिक करा.
https://www.mygov.in/group-poll/vote-your-favorite-tableau-republic-day-2022/
- या वेबसाईटवर गेल्यावर आपल्याला खालीलप्रमाणे चित्र दिसेल.
या चित्रामध्ये Login to participate या शब्दावर क्लिक करा.
- आता आपल्याला Login करण्यासाठी बॉक्स येईल. या बॉक्समध्ये आपण आपला (उत्तम रेंज असलेला) मोबाईल क्रमांक टाका. आणि Login with OTP वर क्लिक करा.
- आपल्याला मोबाईल क्रमांकावर आलेला OTP इथे टाका आणि Login व्हा.
- आपण Login झालात की…..
- केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांद्वारे बनवलेल्या चित्ररथांपैकी कोणत्या रथाला आपण मत द्याल असा प्रश्र्न विचारण्यात आला आहे.
- त्या खाली आपल्याला विविध राज्यांच्या चित्ररथांची यादी दिसेल. त्यामध्ये खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे महाराष्ट्राच्या चित्ररथाला मत द्या.
- त्या खाली कोणत्या विभागाचे संचलन आवडले असाही प्रश्र्न आहे.
- आपण मत केल्यानंतर पुन्हा एकदा Login to participate या शब्दावर क्लिक करा. आपण आधीच Login असल्याने आपले मत नोंदले जाईल.
- आपण नोंदलेल्या मताची खात्री करण्यासाठी आपण नीट पाहिलेत तर आपल्याला पोपटी रंगात Your Vote Was Recorded असा संदेश आपण मत दिलेल्या प्रत्येक बॉक्सवर दिसेल.
- त्याचप्रमाणे याच ठिकाणी आपले मत नोंदल्यानंतर विविध राज्यांच्या चित्ररथांना कीती मते पडली आहेच याची टक्केवारी आपण पाहू शकता.
चला तर मग महाराष्ट्राच्या जैवविविधेतच्या चित्ररथाला मतदान करु या.
इथे आपल्याला राजपथावरील संपूर्ण कार्यक्रमाचा व्हिडिओ पहाता येईल. त्यामध्ये 2:21:13 या वेळेवर महाराष्ट्राचा चित्र रथ आहे.