गुहागर : तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा वेलदुर नवानगर येथे बालभारती पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली आभासी वर्गखोली अर्थात व्हर्च्युअल क्लासरूम बांधण्यात आली आहे. ही वर्गखोली पहाण्यासाठी आज गुहागरचे शिक्षणाधिकारी जगदाळे यांनी शाळेला भेट दिली. ऑनलाइन अध्ययन आणि अध्यापन या दृष्टीने आभासी वर्गखोलीचे महत्त्व त्यांनी जाणून घेतले.
आभासी वर्गखोलीची माहिती देताना मुख्याध्यापक मनोज पाटील म्हणाले की, या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, प्रगत तंत्रज्ञानाशी त्यांचे नाते जोडले जावे. शाळेमध्ये आनंददायी शिक्षण प्रक्रिया अंमलात यावी. म्हणून डिजिटल शाळेसह आभासी वर्गखोली (व्हर्च्युअल क्लासरूम) सुरु केली आहे. बालभारती, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय उपलब्ध करण्याच्या प्रयत्न सुरु आहे. याच दृष्टिकोनातून व्हर्च्युअल क्लासरूमचा उपयोग अध्ययन, अध्यापनासाठी सक्षमतेने कशा प्रकारे करता येईल. या उद्देशाने गटशिक्षणाधिकारी जगदाळे साहेब यांनी व्हर्च्युअल क्लासरूम ला भेट दिली. तेथील कामकाजाबाबत माहिती घेतली आहे. त्याच्यासोबत गुहागर हायस्कूलचे शिक्षक सुधाकर कांबळे ही उपस्थित होते.
यावेळी शाळेत मुख्याध्यापक मनोज पाटील, सत्वशीला जगदाळे, पल्लवी घुले, अंजली चप्पलवार, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सीमा रोहीलकर, ऋतुजा रोहीलकर, सौ विशाखा नाटेकर आदी मान्यवर उपस्थित होते. शाळा व्यवस्थापन समितीतर्फे गटशिक्षणाधिकारी जगदाळेसाहेब तसेच सुधाकर कांबळे यांचा पुष्पगुच्छ व विचार पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.