गुहागर : राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरी ग्रामीण विभागामार्फत दारुबंदी गुन्हयांतर्गत गुहागर तालुक्यातील पालशेत येथे छापा टाकून माडीपासून बनविलेली अवैध फेणीसह गावठी दारु जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
State Excise, Ratnagiri Rural Department has raided Palshet in Guhagar taluka and confiscated village liquor along with illegal feni made from Madi. One person has been charged in the case.
गावठी दारु विक्रीच्या उददेशाने जवळ बाळगल्याने संशयीत इसम प्रविण जगन्नाथ पाटील याच विरुद्ध राष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 मधील तरतूदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाईमध्ये 1400/- किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त श्री. वाय. एम. पवार, रत्नागिरी जिल्ह्याचे अधीक्षक श्री. व्ही. व्ही. वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक श्री. व्ही. एस. मारे, दुय्यम निरीक्षक श्री. सत्यवान भगत, श्री. किरण ए. पाटील, जवान श्री. एम. एस. धोत्रे, श्री. डि. एस. कालेलकर यांनी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास उत्पादन शुल्क, रत्नागिरी दुय्यम निरीक्षक एस. ए. भगत हे करीत आहेत.