गुहागर : गुहागर पंचायत समितीचे माजी सभापती आणि आमदार भास्करराव जाधव यांचे विश्वासू सहकारी कोतळूक गावाचे सुपुत्र श्री. विलास वाघे यांची रत्नागिरी जिल्हा नियोजन मंडळावर सदस्य म्हणून निवड झाली आहे. या निवडीबद्दल श्री. वाघे यांच्यावर सर्वस्थरातून अभिनंदन होत आहे.
गुहागर तालुक्यातील कोतळूक गावातील सर्वसामान्य कुटूंबात जन्मलेल्या विलास वाघे यांनी सामाजिक कार्यापासूनच आपल्या राजकीय कार्याला सुरुवात केली होती. कोतळूक विविध कार्यकारी सहकारी संस्थेमध्ये सचिव म्हणून चांगल्याप्रकारे काम पाहत आहेत. गावातील प्रियदर्शनी शिक्षण संस्थेवर संचालक म्हणूनही अनेक वर्षे आहेत. आमदार भास्करराव जाधव यांनी गुहागर तालुक्याचे पालकत्व घेतले तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघटना वाढिसाठी श्री. वाघे यांचाही खारीचा वाटा होता. या कामाची पोचपावती म्हणून आ. जाधव यांनी श्री. वाघे यांना गुहागर पंचायत समितीची उमेदवारी दिली. भाजपच्या बालकिल्ल्यात वाघ यांनी राष्ट्रवादीचा झेंडा रोवला. त्यांना सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाली. पंचायत समितीमध्ये अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समानव्य ठेऊन उत्तम प्रशासन चालविले. आजही त्यांच्या कामाची चर्चा गुहागर पं. स. परिसरात होताना दिसते.
गेली अनेक वर्षे आम. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे विलास वाघे सेनेत आल्यानंतरहि जाधव यांचे प्रामाणिक आणि निस्वार्थीपणे काम केले. प्रशासनाची उत्तम जाण असलेल्या श्री. वाघे यांना आमदार जाधव यांनी रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीवर नियुक्ती केली आहे.