• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पडवे गटातर्फे विक्रांत जाधव यांचा सत्कार

by Ganesh Dhanawade
April 1, 2021
in Old News
18 0
0
पडवे गटातर्फे विक्रांत जाधव यांचा सत्कार
35
SHARES
99
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद पडवे गट शिवसेनेच्या वतीने जिल्हा परिषदचे नवनिर्वाचित अध्यक्ष विक्रांत भास्कर जाधव यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.
शाहीर सचिन पवार यांनी पोवड्यातून अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या कार्यकर्तृत्वाचा गुणगौरव केला. त्यानंतर जिल्हा परिषद पडवे गटाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी परिसरातील अनेक सरपंच,वाडीप्रमुख, विविध संघटना यांच्या वतीनेही सत्कार करण्यात आला.
तालुकाप्रमुख सचिन बाईत, जिल्हा परिषद सदस्य महेश नाटेकर, पंचायत समिती सभापती पूर्वी निमूणकर, विनायक मुळ्ये, गुहागर युवासेना तालुकाध्यक्ष अमरदिप परचुरे, चिपळूण युवासेना तालुकाध्यक्ष उमेश खताते, पंचायत समिती सदस्य रविंद्र आंबेकर, सिताराम ठोंबरे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रदीप सुर्वे,युवासेना उपजिल्हा अधिकारी सचिन जाधव, जामसुत सरपंच बाबू सावंत,  शरद साळवी, बाबा वैद्य, के.बी.उकार्डे,विभाग प्रमुख नरेश निमूणकर, आबलोली शाखा प्रमुख संदीप निमूणकर, महिला आघाडी वनिता डींगणकर, पूजा कारेकर यांसह विभागातील सर्व शाखाप्रमुख,महिला आघाडी, युवासैनिक ,शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित होते. अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी सत्काराला उत्तर देताना सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.एकाच टर्म मध्ये विरोधी पक्षनेता ते अध्यक्ष अशी दोन्ही पदे सांभाळण्याचा, गुहागर तालुक्यातून पहिल्यांदाच अध्यक्ष होण्याचा व कमी वयात अध्यक्ष होण्याचा मान मला मिळाला असून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी केले.सुत्रसंचालन नरेश निमुणकर यांनी केले.

Tags: GuhagarGuhagar NewsMarathi NewsMLA Bhaskar JadhavNews in GuhagarshivsenaVikrant Jadhavचिपळूण युवासेनाजिल्हा परिषद गटटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युजविक्रांत भास्कर जाधव
Share14SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.