गुहागर : दोन वर्ष सुरू असणाऱ्या कोरोना काळात सततच्या लाॅकडाऊनमुळे समाजाला आर्थिक टंचाईला सामोरे जावे लागत आहे. या काळात सतत बंद राहिलेले उद्योगधंदे, नोकऱ्या मध्ये झालेले चढ उतार, दवाखान्यांचा व औषधांचा खर्च यामुळे समाजाची आर्थिक घडी विस्कळित झाली आहे. या परिस्थितीत सामजिक बांधिलकी जपण्यासाठी विद्या प्रसारक मंडळ, ठाणे संचलित महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय वेळणेश्वर या महाविद्यालयाच्या वतीने विद्या प्रसारक मंडळ शिष्यवृत्ती योजना जाहीर केली आहे.
The continuous lockdown during the two-year Corona period has left the community facing economic scarcity. The economic downturn of the society has been disrupted due to the continuous closure of industries during this period, fluctuations in jobs, cost of hospitals and medicines. In order to maintain social commitment in this situation, Vidya Prasarak Mandal, Thane-run Maharshi Parashuram Engineering College, Velneshwar has announced Vidya Prasarak Mandal Scholarship Scheme.
या योजनेअंतर्गत प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या प्रथम 100 व थेट द्वितीय वर्षीत प्रवेश घेणाऱ्या प्रथम 50 विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2021-22 चे शैक्षणिक शुल्क (Tuition Fee) माफ केले जाणार आहे. ही योजना महाविद्यालयात प्रथम वर्ष किंवा थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेणाऱ्या सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी श्री. आशिष चौधरी – 80076 27888, श्री. रोहन गोंधळेकर – 90045 18067 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.