नागरिकांना मोठा दिलासा
गुहागर : धोधो कोसळलेल्या पावसाने वेलदूर – नवानगर -धोपावे मार्गावर दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली होती. ऐन गणेशोत्सवात दरड कोसळल्याने नागरिकांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागत होता. अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने पाऊस कमी झाल्याचे पाहून कोसळलेली दरड बाजूला करून मार्ग पूर्ववत केला आहे.
The traffic on Veldur-Nawanagar-Dhopave road was jammed. In Ain Ganeshotsav Due to the collapse, the citizens had to travel a long way. Finally, the Public Works Department has reversed the collapse landslide The path is undone.
गुहागर तालुक्यात दि. 7 सप्टेंबर रोजी कोसलेल्या पावसाने अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. याचवेळी वेलदूर – नवानगर – धोपावे फेरीबोट जेटीकडे जाणाऱ्या मार्गावर अतिवृष्टीने मोठी दरड कोसळून मार्ग पूर्णपणे बंद झाला होता. या घटनेची तालुका प्रशासनाला कल्पना मिळताच कोसळलेली दरड बाजूला करण्यात आली. मात्र पुन्हा त्याच ठिकाणी दरड कोसळण्याची घटना घडल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता रस्त्यालगतचा डोंगरावर भूसंखलन होत असल्याने पाऊस पडल्यास पुन्हा दरड कोसळून मार्ग बंद होणार आहेच, शिवाय दुर्घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन कोसळलेली दरड काही दिवस तशीच ठेवण्यात आली होती. त्यामुळे परिसरातील नागरिकांना व बाहेरून येणाऱ्या चाकरमान्यांनाहि धोपावे फेरीबोटीला जाण्यासाठी दुरावस्था झालेल्या रानवी – धोपावे रस्त्यावरून वळसा घालून जावे लागत होते. गेली 10 दिवस नागरिकांना मार्ग बंद पडल्याने त्रास सहन करावा लागला होता.
दरम्यान, पाऊस कमी झाल्याचे पाहून सार्वजनिक बांधकाम विभागाने कोसळलेली दरड रस्त्यावरून बाजूला करून वेलदूर धोपावे मार्ग वाहतुकीसाठी पूर्ववत केला आहे. येथील नागरिकांना मार्ग मोकळा झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.