दहा दिवसीय प्रशिक्षण शिबिरात 35 महिलांचा सहभाग
गुहागर, ता. 05 : तालुक्यातील पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात महिलांसाठी 10 दिवसीय भाजीपाला प्रशिक्षण वर्ग (vegetable cultivation training) पार पडला. या प्रशिक्षणाला पालशेत प्रभागातील १४, वेळणेश्वर १०, अंजनवेल ६ व पडवे प्रभागातील ५ अशा एकूण 35 महिला उपस्थित होत्या. स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थान रत्नागिरी व उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पं.स. गुहागर यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर घेण्यात आले.


प्रशिक्षण शिबिरात सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला लागवड, vegetable cultivation training घरामध्येच खते व औषधांची निर्मिती कशी करु शकतो. याची माहिती मंदार जोशी यांनी दिली. सेंद्रिय पोषण परसबाग या विषयावर कृषी सहाय्यक प्रतिक बांगर यांनी मार्गदर्शन केले. भाजीपाला लागवडीवरील कीड रोग नियंत्रणाच्या पद्धती आणि भाजीपाला लागवड तंत्र व व्यवस्थापन याची माहिती कृषी सहाय्यक एस.बी.चव्हाण यांनी दिली. चवळी, मिरची, वांगी, कलिंगड, पावटा, कडवा या पिकांबाबत लागवडीपासून काढणी पश्चात तंत्रज्ञानाविषयी कृषी सहाय्यक विकास पिसाळ यांनी मार्गदर्शन केले. माती परीक्षण, विविध शासकीय तसेच मग्रारोहयो व इतर बँकिंग योजनाबाबत, कृषी पूरक व्यवसायांबाबत श्रीम. राहिला बोट यांनी मार्गदर्शन केले.
क्षेत्रीय भेटी दरम्यान प्रत्यक्ष पाहणीद्वारे कृती व पिकाबाबतची माहिती श्रीम. नम्रता भेकरे यांनी दिली. यात प्रामुख्याने ‘फळबाग लागवडीमध्ये भाजीपाला एक आंतरपीक ही संकल्पना’ vegetable cultivation training विषद केली. एका एकरमध्ये नियोजनबद्ध अनेक पिके कशी घ्यावीत. त्यातून उत्पादन खर्च कसा कमी करावा. कोकणात हळद लागवड कशी यशस्वी होते. याविषयी भेकरे यांनी केले.
३१/१२/२०२१रोजी या प्रशिक्षण वर्गाची सांगता झाली. प्रशिक्षण वर्गाच्या सांगता समारंभात डी.डी.कानसे यांनी महिलांना बँकिग सेवा विषयी चांगले मार्गदर्शन केले. तालुक्यातील सर्व गावातून निर्माण होणाऱ्या सेंद्रिय व आरोग्यास पोषक अशा भाजीपाल्याला ग्राहकांनी चांगला भाव व उत्तम प्रतिसाद देऊन खरेदी करावी. असे आवाहन कानसे यांनी केले. vegetable cultivation training १० दिवसीय vegetable cultivation training प्रशिक्षण वर्गाला ग्रामपंचायत पाटपन्हाळेचे सरपंच संजय पवार, ग्रामविकास अधिकारी बेंडल, स्टार स्वरोजगार केंद्र रत्नागिरीचे संचालक डी. डी. कानसे व सांबरे, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष व्यवस्थापक राहिला बोट, श्रीम. ओक, श्री हळदणकर, श्रीम. मिलन जाधव, प्रभाग समन्वयक तसेच प्रभाग संघ व्यवस्थापक श्रीम. संजना रावणंग, श्रीम नेहा पवार यांनी प्रशिक्षण वर्ग यशस्वी करण्यासाठी सहकार्य व विशेष प्रयत्न केले.