गुहागर : गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी (Patpanhale Education Society) संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय(New English School and Junior College) पाटपन्हाळे विद्यालयातील इयत्ता ९ वीमधील विद्यार्थी कु. वेदांत किरण शिवणकर या विद्यार्थ्याची “स्मार्ट बॅग “( Smart bag) या उपक्रमासाठी केंद्र सरकारच्या इन्स्पायर अवॉर्ड(Inspire Award) मानांकन योजना अंतर्गत राज्यस्तरीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनकरिता(State Level Inspire Award Performance) रत्नागिरी जिल्ह्यांमधून निवड झाली आहे. राज्यस्तरीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनासाठी कु. वेदांत शिवणकर पाटपन्हाळे हायस्कूलच्या विद्यार्थ्याची निवड झाल्याने अभिनंदन होत आहे.
सन २०२० – २०२१ या शैक्षणिक वर्षातील इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनकरिता रत्नागिरी जिल्ह्यातून सुमारे ७५० नामांकने नोंदविण्यात आली होती. त्यापैकी रत्नागिरी जिल्हास्तरीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनकरिता ७७ विद्यार्थी निवडले होते. निवडलेल्या जिल्हास्तरीय इन्स्पायर अवॉर्ड विद्यार्थ्यांमधून न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे या विद्यालयाचा वेदांत शिवणकर या विद्यार्थ्यांची “स्मार्ट बॅग ” या उपक्रमासाठी निवड झाली आहे.
कु. वेदांत शिवणकर याने राज्यस्तरीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनकरिता “स्मार्ट बॅग ” हा उपक्रम निवडला असून या प्रतिकृतीची(Replica) सर्वसामान्यांना परवडेल अशी बॅग आहे. जीपीएस लोकेशन ट्रॅकिंग सिस्टिम, अँटीथेप्ट अलार्म, युएसबी चार्जिंग पोर्ट, सोलार पॅनेलचा वापर करून मोबाईल रिचार्ज करता येणारी रिचार्जेबल बॅटरी, इनसाईड लाइट , रात्रीच्या वेळेला बॅटरीची सुविधा, जलरोधी, रिफ्लेक्टरची व्यवस्था, जाहिरात करणारी बॅग, बॅगसाठी न्यूमरिकल लॉकची व्यवस्था अशी वैशिष्ट्ये आहेत. या वैशिष्ट्यपूर्ण तयार केलेल्या “स्मार्ट बॅग ” या प्रतिकृतीमुळे कु. वेदांत शिवणकर याची राज्यस्तरीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. “स्मार्ट बॅग ” बनविण्यासाठी श्रद्धा बॅगचे मालक श्री. खोत यांची मदत झाली. तसेच या उपक्रमासाठी न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक व विज्ञान शिक्षक एस. टी. गावडे , विज्ञान शिक्षिका सौ.नांदलस्कर , विज्ञान शिक्षक के. डी. शिवणकर व इतर विज्ञान शिक्षकांची मदत व मार्गदर्शन(Guidance) लाभले. तसेच मुख्याध्यापक श्री.एस. डी. हिरवे यांची प्रेरणा लाभली अशी प्रतिक्रिया कु. वेदांत शिवणकर याने व्यक्त केली.
राज्यस्तरीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनासाठी न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी कु. वेदांत शिवणकर याची निवड झाल्याबद्दल पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे(Patpanhale Education Society) अध्यक्ष भालचंद्र चव्हाण, उपाध्यक्षा सुचिता वेल्हाळ, सचिव सुधाकर चव्हाण, खजिनदार सुजाता चव्हाण व संचालक अभिनंदन करून राज्यस्तरीय यशासाठी शुभेच्छा दिल्या.