अहमदाबाद मधील वार्षिक सर्वसाधारण सभेत नियुक्त्या जाहीर
गुहागर, ता. 14 : मुंबईचे जगप्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत यांची संस्कार भारतीचे अखिल भारतीय अध्यक्ष म्हणून फेरनिवड झाली असून प्रसिद्ध वायोलिन वादक मैसूर मंजूनाथ, ज्येष्ठ अभिनेते डॉ नीतिश भारद्वाज आणि सीसीआरटीच्या अध्यक्ष, शिक्षणतज्ज्ञ डॉ हेमलता मोहन यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. राजस्थानचे अश्विन दळवी नवे राष्ट्रीय महामंत्री तर अभिजित गोखले राष्ट्रीय संघटनमंत्री असतील. Mumbai-based world-renowned painter Vasudev Kamat has been re-elected as the All India President of Sanskar Bharati. Famous violinist Mysore Manjunath, Senior Actor Dr Nitish Bhardwaj and CCRT president, educationist Dr. Hemalata Mohan have been selected as vice presidents. Rajasthan’s Ashwin Dalvi will be the new National General Minister while Abhijit Gokhale will be the National Union Minister.
कर्णावती (अहमदाबाद) येथे नुकत्याच संपन्न झालेल्या संस्कार भारतीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आगामी तीन वर्षांकरीता राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. नाशिकचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रवींद्र बेडेकर यांचा राष्ट्रीय मंत्री म्हणून या कार्यकरिणीत समावेश करण्यात आला आहे.
नागपूरचे प्रसिद्ध वक्ते आशुतोष अडोणी, अ.भा. साहित्य संयोजक, मुंबईचे प्रसिद्ध रंगकर्मी प्रमोद पवार, अ. भा. नाट्यविधा संयोजक, सोलापूरचे रघुराज देशपांडे, भूअलंकरण संयोजक, पुण्याचे चित्रकार रवी देव यांची राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर नागपूरचे चंद्रकांत घरोटे व अमरावतीचे अजय देशपांडे यांचेकडे अनुक्रमे पश्चिम क्षेत्र प्रमुख व सहप्रमुख म्हणून दायित्व सोपविण्यात आले आहे.
कर्णावतीच्या त्रिमंदिर दादाधाम परिसरात ४ व ५ डिसेम्बरला संपन्न झालेल्या अधिवेशनाचे उदघाटन विख्यात नाट्यकलाकार यजदीभाई करंजिया, साहित्यिक-इतिहासकार विष्णु पंण्ड्या, लोककलाकार जोरावरसिंग जादव, प्रसिद्ध वादक शहाबुद्दीन राठोड आणि अभिनेता मनोज जोशी या पद्मश्री प्राप्त ज्येष्ठ कलावंतांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. संस्कार भारतीचे संरक्षक पद्मश्री बाबा योगेंद्र, वासुदेव कामत, गुजरात प्रांत अध्यक्ष महेंद्र त्रिवेदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
द्विदिवसीय सभेचे संचालन राष्ट्रीय संघटन मंत्री अभिजित गोखले यांनी केले. सभेत प्रामुख्याने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी उपक्रमांवर चर्चा झाली. स्वातंत्र्य आंदोलनातील लोककलावंतांच्या योगदानाचा इतिहास प्रकाशमान व्हावा यासाठी विशेष प्रयत्न करण्याचा संकल्प सभेत करण्यात आला. कोरोना काळात कलावंतांच्या मदतीसाठी संस्कार भारतीने संपूर्ण देशात राबवलेल्या ‘पीड पराई जाणे रे’ या सहायता उपक्रमात सहभागी सर्वांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
सभेला देशभरातील विविध प्रांतातील संस्कार भारतीचे प्रमुख कार्यकर्ते व विशेष निमंत्रित नामवंत कलाकार बहुसंख्येने उपस्थित होते.