विजापूर महामार्गासाठी स्वत:हून जागा खाली करा
गुहागर, ता. 25 : शहरातील एस.टी. स्टॅण्ड परिसरातील काही खोकेधारकांना तसेच दुकानदारांना महामार्गासाठी जागा रिकाम्या करुन द्याव्यात. अशा नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा गुहागरातील काही दुकानांवर बुलडोझर फिरण्याची स्थिती आहे. (vacant the shops immediately)
गुहागर विजापूर महामार्गाचे काम आता हळूहळू 0 कि.मि. पर्यंत येणार असे चिन्ह आहे. महामार्गाचा प्रारंभ बिंदू (0 कि.मी.) शहरातील बाजारपेठ नाक्यात आहे. एस.टी. स्टॅण्ड ते बाजारपेठ नाका दरम्यान 12 दुकाने 2 घरे आहेत. यापैकी 8 जणांना जागा रिकाम्या करुन देण्याच्या अंतिम सूचना शासनातर्फे देण्यात आल्या आहेत. गुहागरचे प्रवेशद्वार असलेल्या शासकीय गोदामापासून बाजारपेठ नाक्यापर्यंतचा विचार केला तर अनेक खोके हे वर्षानुवर्ष शासकीय जागेत आहेत. अशा खोकेधारकांनाही जागा खाली करुन देण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. vacant the shops immediately
आजपर्यंत महामार्ग प्राधिकरणतर्फे गुहागर शहर कार्यक्षेत्रातील किती जागा घेणार याची माहिती सर्वांपर्यंत पोचवलेली नाही. ज्यांच्या जागा संपादित कराव्या लागणार आहेत त्यांनाच आम्ही नोटीसा पाठवू. अशी भूमिका महामार्ग प्राधिकरणने घेतली. त्यामुळे शहरातील तमाम जनता गुहागर शहरातील महामार्गाच्या भुसंपादनाबाबत अनभिज्ञ आहे. तसेच सुरवातीला महामार्ग प्राधिकरणने गुहागर विजापूर महामार्गाबाबत जो विकास आराखडा जाहीर केला त्यामध्ये अनेक बदल झाले आहेत. या पार्श्र्वभुमीवर आज आलेल्या अंतिम नोटीसांमुळे संबंधित खोकेधारक आणि दुकानदार यांना किती नुकसानभरपाई मिळणार, अन्यत्र जागा देणार का याबाबतही गुहागरच्या जनतेमध्ये प्रश्र्नचिन्ह आहे. vacant the shops immediately
गेल्या तीन वर्षात सातत्याने वेगवेगळ्या कारणाने गुहागर शहरातील वातावरण अनिश्चिततेचे बनले आहे. याची सुरवात सीआरझेड प्रकरणातील कारवाई पासून झाली. जेटी आणि सी व्ह्यु गॅलरी तोडल्यानंतर शहरातील सीआरझेडमधील बांधकामांवर कारवाईची प्रक्रिया शासनाने राबवली. त्यानंतर समुद्रकिनाऱ्यावरील चौपाटीवर अतिक्रमणाचा शिक्का मारुन बंदर विभागाने जेसीबी फिरवला. आता महामार्गाच्या कामासाठी येथील काही दुकाने खाली करुन देण्याची वेळ गुहागरकरांवर आली आहे. विकासाच्या वाटेवर (?) आणखी किती गोष्टी सोसाव्या लागणार असा प्रश्र्न यानिमित्ताने गुहागरकरांना पडला आहे. vacant the shops immediately
In the last three years, the atmosphere in Guhagar city has become uncertain due to various reasons. It all started with the action in the CRZ case. After the demolition of the jetty and sea view gallery, the government took action against the constructions in CRZ in the city. After that, the port department turned the JCB by stamping the encroachment on the beach square. Now it is time for Guhagarkar to take down some of the shops here for highway work. Guhagarkar is faced with the question of how many more things he will have to endure on the path of development (?).