कंपनीच्या सामाजिक दायित्वातून रुग्णालयातील समस्या दूर
गुहागर : तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पातील युटिलिटी पावरटेक लिमिटेड तर्फे सन २०२०/२१ च्या सीएसआर मधून कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक असीमकुमार सामंत यांच्या उपस्थितीत गुहागर ग्रामीण रुग्णालयाला २५ केव्ही सायलेंट जनरेटर भेट देण्यात आला. गुहागर ग्रामीण रुग्णालयाची मोठी समस्या दूर होण्यास युटीलिटी पावरटेक लि. ने मोठा हातभार लावल्याने सर्वस्थरातून कंपनीचे कौतुक होत आहे.
यावेळी डेप्युटी जनरल मॅनेजर जॉन फिलिप्स, यूपीएलचे निवासी व्यवस्थापक दिनेश चौधरी, व्यवस्थापक नितीन खानविलकर, ऋषिकेश भाटिया, विनय कुमार, प्रमोद चव्हाण, आशीत म्हात्रे, संजय कासेकर आदी उपस्थित होते.
गुहागर तालुक्यात ग्रामीण होणारे सोडल्यास अधिक उपचारासाठी तालुक्यातील रुग्णांना चिपळूण येथे ५० किमी अंतरावर जावे लागते. कोरोना काळात गुहागर ग्रामीण रुग्णालयामध्ये कोरोनाग्रस्त आणि इतर रुग्णांचा अधिक भार असताना रुग्णालयात वीजपुरवठा खंडित झाल्यास मोठी अडचण निर्माण होत होती. येथील यंत्रसामग्रीसाठी विजेचे अत्यंत गरज होती. त्यासाठी रुग्णाला जनरेटरची सुविधा मिळावी, अशी मागणी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. दाभोळे यांनी आमदार भास्कर जाधव व गुहागर नगरपंचायतीकडे केली होती. या वृत्ताची दखल घेऊन युटीलिटी पावरटेक लिमिटेडने सन २०२०/२१ मधून रुग्णालयाला हा जनरेटर उपलब्ध करून दिला आहे. सदरील जनरेटर वैद्यकीय अधिकारी डॉ. दाभोळे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला आहे.
यावेळी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. सामंता यांनी गुहागर ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी उपलब्ध यंत्रसामुग्री मध्ये करत असलेल्या रुग्णसेवेबद्दल कौतुक केले. तसेच रुग्णालय व रुग्णालय परिसरात अस्वच्छता अधिक प्रभावी करण्यासाठी ५ जी जपानी पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन करून स्वच्छतेची शपथ दिली. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दाभोळे यांनी रुग्णालयात रुग्णांवर उपचारादरम्यान वीज पुरवठा खंडित झाल्यास मोठी अडचण निर्माण होत होती. आता आपल्या सहकार्यामुळे ही समस्या दूर झाली असून याचा रुग्णांना नक्कीच फायदा होईल. जनरेटर भेट दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.
युटीलिटी पावरटेक लिमिटेड तर्फे सी एसआर अंतर्गत परिसरातील विद्यार्थी व गरजू लोकांसाठी साहित्य देत असते. या पूर्वीही कंपनीने अंजनवेल, वेलदूर येथील शाळांना खेळाचे साहित्य, कॉम्प्युटर, स्वच्छतेसाठी डस्टसबिन, कुलर, गुहागर हायस्कूलला बोरवेल पंप, पाण्याची टाकी, खेळाचे साहित्य, तसेच गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेला व्हीलचेअर, कुबड्या, वॉटर प्युरिफायर व धान्य आदी वस्तूंचे वाटप केले आहे.