गुहागर : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा वेलदुर नवानगर शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून प्रशस्त अशा कलादालनाचे व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तैलचित्राचे अनावरण मुख्याध्यापक मनोज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
Zilla Parishad Purna Prathamik Adarsh Marathi Shala Veldur Nawanagar School should give space to the artistic talents of the students Hence the unveiling of such a spacious art gallery and oil paintings of Chhatrapati Shivaji Maharaj It was done by the headmaster Manoj Patil.
यावेळी पदवीधर शिक्षक सत्वशीला जगदाळे, पल्लवी घुले, अंजली मुद्दलवार, निलोफर शेख व ग्रामस्थ उपस्थित होते. विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच्या क्षेत्रांमध्ये उत्तुंग झेप घ्यावी हाच खरा बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायद्याचा गाभा असून गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कौशल्याधिष्ठित आनंददायी शिक्षण मिळावे या दृष्टीने या कलादालनाचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे असे मुख्याध्यापक मनोज पाटील यांनी सांगितले. पालक व समाज सहभाग यांच्या माध्यमातून वर्ग खोलीचे सुशोभिकरण आणि शालेय रंगरंगोटी करण्यात आली. याकामी चित्रकार गणेश रावणंग व प्रणय घुमे यांचे सहकार्य लाभले.
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा वेलदुर नवानगर शाळेला गेल्यावर्षी रत्नागिरी जिल्हा परिषदे मार्फत आदर्श शाळा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. पालक सहभागातून कलादालन अभ्यासिका वर्ग सुरू केल्याबद्दल शाळेचे कौतुक होत आहे. यापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या राज्यस्तरीय शिक्षण वारी या अभूतपूर्व प्रतिसाद लाभलेल्या व मुंबई कोल्हापूर वर्धा नांदेड जळगाव या ठिकाणी पालक सहभागातून गुणवत्तापूर्ण विकास यावर आधारित स्टॉलद्वारे शाळेने आपल्या उपक्रमांचे सादरीकरण केले आहे.