पाटपन्हाळेतील प्रकार; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
गुहागर : घरामध्ये एकटीच झोपलेल्या ९० वर्षीय वृध्देच्या गळ्यातील २२ ग्रँमची सोन्याची माळ अज्ञाताने हिसकावून नेल्याचा प्रकार गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे गणेशवाडी येथे गुरुवारी मध्यरात्री २ च्या सुमारास घडला. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Unknown snatching of 22 gram gold necklace from 90 year old man sleeping alone in the house the incident took place at Patpanhale Ganeshwadi in Guhagar taluka around 2 am on Thursday. A case has been registered against the unidentified thief at Guhagar police station.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाटपन्हाळे येथील निर्मला सीताराम गुरव असे या वृध्द महिलेचे नाव आहे. तिचे दोन मुलगे नोकरीनिमित्त मुंबईत असतात. त्यामुळे गावाला घरामध्ये एकटीच ही वृध्दा असते. वयोमानानुसार या वृध्देने गुरुवारी २५ नोव्हेंबर रोजी रात्री झोपताना घराचा पुढील दरवाजा कडी न लावता केवळ लावून घेतला होता. नेमका याच संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने हा डाव साधला. या चोरट्याने चोरी करण्यापूर्वी या भागातील पथदीप बंद करुन व काळोखाचा फायदा घेऊन या वृध्देच्या घरामध्ये प्रवेश केला आणि ती झोपलेली असताना तिच्या गळ्यातील २२ ग्रँमची माळ खेचून नेली. याप्रकरणी गुहागर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कदम व आनंद पवार करीत आहेत.