गुहागर : सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या उमराठ गावाच्यावतीने चिपळूण आणि परिसरातील 450 पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली.
On behalf of Umrath village, which has always been at the forefront of social work Essential relief items were provided to 450 flood victims in and around Chiplun.
तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्री संदीप गोरीवले यांच्या अध्यक्षतेखाली व उमराठचे सरपंच श्री जनार्दन आंबेकर तसेच ग्रामस्थ यांच्या मार्गदर्शनानुसार उमराठ ग्रामस्थांतर्फे चिपळूण पुरग्रस्तांना सुमारे 1 लाख 10 हजार रुपयांच्या जीवनावश्यक वस्तुंचे ४५० किट वाटप करण्यात आले.
या किटमध्ये २ किलो तांदूळ, १ किलो गहू पिठ, पाव किलो डाळ, पाव किलो चणे, १ नग बिस्कीट पुडा, १ नग टॉवेल, १ पॉकीट कुळीथ पीठ, १ पॉकीट लोणचे आदी वस्तूंचा समावेश होता.