• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

सुप्रो गाडी अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

by Ganesh Dhanawade
December 13, 2021
in Guhagar
20 0
0
सुप्रो गाडी अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू
39
SHARES
110
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : वेगाने जाणाऱ्या महेंद्रा सुप्रो गाडीने दुचाकीस्वाराला धडक देऊन झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हा अपघात ७ डिसेंबर रोजी कुडली ते तरीबंदर दरम्यान घडला होता.
A speeding Mahindra Supro hit a two-wheeler in an accident a seriously injured cyclist has died during treatment.The accident took place on December 7 between Kudli and Taribandar.

अधिक माहिती अशी की, महेंद्रा सुप्रो एम.एच.०८ एपी २२१३ क्रमांकाचे गाडी चालक जितेश काजरोळकर हे कुडली बंदरवाडी ते बौद्धवाडी अशीवेगाने गाडी चालवित असताना याचवेळी कुडली टाकेवाडी ते कुठली तरीबंदर अशी जाणारी हिरो एचएफ डीलक्स गाडी क्र. एम.एच,०८ एटी ३१९३ या दुचाकीस्वाराला धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील अरुण चंद्रकांत सुर्वे (कुडली टाकेवाडि, वय 29) व मानसी मंगेश सुर्वे हे दोघे जखमी झाले. अरुण सुर्वे हा गंभीर जखमी झाल्याने त्याला रत्नागिरी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या अपघाताची फिर्याद हेड कॉन्स्टेबल स्वप्निल शिवलकर यांनी गुहागर पोलीस ठाण्यात दिली होती. अपघातास कारणीभूत असलेल्या जितेश काजरोलकर याच्या विरोधात भा. दं. वि. कलम ३०४ अ, २७९, ३३७, ३३८ व मोटार वाहन कायदा कलम अधिनियम १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पो. सहा. निरीक्षक बी. के. जाधव करीत आहेत.

Tags: AccidentcyclistGuhagarGuhagar NewsinjuredMahindra SuproMarathi NewsNews in Guhagartreatmenttwo-wheelerअपघातटॉप न्युजताज्या बातम्यादुचाकीस्वारमराठी बातम्यामहेंद्रा सुप्रो गाडीलोकल न्युजसुप्रो गाडी
Share16SendTweet10
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.