वन विभागाच्या नियंत्रणात कासव संवर्धन मोहिम सुरू
गुहागर, ता. 15 : येथील समुद्रकिनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या 4 मादी कासवांनी 448 अंडी घातली होती. (Turtle conservation in Guhagar) ही अंडी कासवमित्र संदेश भोसले यांनी वन विभागाच्या कासव संवर्धन कक्षात संरक्षित केली आहेत. तसेच तालुक्यातील तवसाळ येथे 2 मादी कासवांची 147 अंडी संरक्षित करण्यात आली आहेत. वन विभागाच्या माध्यमातून तवसाळ व गुहागर ही दोन संवर्धन केंद्र सुरु आहेत.
यावर्षी (2021-22 च्या हंगामात) 21 डिसेंबरला Olive Ridley Turtle पहिली मादी अंडी घालण्यासाठी गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर आली. त्या मादी कासवाची 94 अंडी संरक्षित करण्यात आली. त्यानंतर 12 जानेवारी 122 अंडी, 13 जानेवारील 141 आणि 14 जानेवारी 91 अशी 448 अंडी आजपर्यंत संरक्षित करण्यात आली आहेत. तवसाळमध्येही डिसेंबर महिन्याच्या अखेरीस एका मादी कासवाने अंडी घातली. तर दुसरी मादी जानेवारी महिन्यात आली होती. तेथे 147 अंडी संरक्षित करण्यात आली आहेत. (Turtle conservation in Guhagar)
चिपळूणातील सह्याद्री निसर्गमित्र या संस्थेचे कार्यवाह भाऊ काटदरे यांनी कासव संवर्धनाची मोहिम गुहागरमध्ये सुरु केली. (Turtle conservation in Guhagar) त्यानंतर वन खात्याने ही मोहिम सुरु ठेवली आहे. गेली 13 वर्ष गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर कासव संवर्धनाचे काम सुरु आहे. आज रत्नागिरी जिल्ह्यातील कासव संवर्धनाचे सर्वांत मोठे केंद्र म्हणून गुहागर तालुक्याकडे पाहिले जाते. (Turtle conservation in Guhagar)
सर्वसाधारणपणे दरवर्षी नोव्हेंबर महिन्यापासून ऑलिव्ह रिडले प्रजातीचे मादी कासव गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी येते. हवामानातील बदल आणि अरबी समुद्रात आलेली तीन चक्री वादळे यामुळे 2020-21 चा हंगाम उशिरा सुरु झाला. 15 जानेवारीला गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर पहिले घरटे सापडले होते. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी 20 दिवस आधी ऑलिव्ह रिडले मादी अंडी घालण्यास आली. (Turtle conservation in Guhagar)
कासव संवर्धन मोहिम आल्हादकाकांविना
गुहागरमधील कासव संवर्धन मोहिमेमध्ये कै. विश्र्वास खरे यांचे योगदान मोठे आहे. त्यांनी स्वच्छेने सुरु केलेल्या संवर्धन मोहिमेत (Turtle conservation in Guhagar) अनेक तरुणांना जोडले होते. ऑलिव्ह रिडले कासव पहाण्यासाठी त्यांच्या संवर्धन केंद्रात अनेक पर्यटक येत असत. त्यांच्या निधनानंतर गेली 4 वर्षे हे काम आल्हाद तोडणकर पहात होते. गुहागरमधील स्थानिक कासव संवर्धन प्रेमी, पत्रकार, वन विभाग यांच्याबरोबर उत्तम समन्वयातून आल्हादकाका हे काम करत होते. अनेक पर्यटकांपर्यंत गुहागरमधील कासव संवर्धनाविषयी त्यांनी जनजागृती (Turtle conservation in Guhagar) केली. गेली 4 वर्षे दररोज पहाटे ५ ते सकाळी 10 आणि सायंकाळी 6 ते 9 या वेळात ते गुहागरच्या लांबलचक समुद्रकिनाऱ्यावर फिरत असतं. त्यांच्या शोधकार्यामुळेच गुहागरच्या समुद्रावरील कासवांच्या घरट्यांची संख्या वर्षागणिक वाढत गेली. गेल्यावर्षी त्यांचे निधन झाल्याने कासव संवर्धन मोहिम पोरकी झाली होती. परंतू आता त्यांचेच सहकारी असलेल्या संदेश भोसले यांनी हे काम हाती घेतले आहे.
ऑलिव्ह रिडले प्रजातीची मादी समुद्रावर आल्यावर जागा कशी शोधते, अंडी कशी घालते, अंडी घातल्यानंतर समुद्रात कशी जाते. याचे संपूर्ण चित्रण पहाण्यासाठी गुहागर न्यूजच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवरील व्हिडिओ आवर्जुन पहा.