गुहागर : तालुक्यातील मौजे पाचेरीसडा येथील रास्त भाव धान्य दुकानासंदर्भात झालेल्या तक्रारीबाबत गावातील ग्रामस्थ व रेशन दुकान चालक यांच्यामध्ये समोपदेशनाची बैठक पार पडली. या बैठकित वादावर तक्रारदार, ग्रामस्थांचे निरसन झाले असून आता रास्त धान्य दुकानामधून धान्याची उचल करणार आहेत.
A counseling meeting was held between the villagers and the ration shop operators regarding the complaint regarding the fair price grain shop at Pacherisada. Complainants and villagers have resolved the dispute in this meeting and now they are going to pick up the grain from the fair price right grain shop.


दि. 28 रोजी घेण्यात बैठकीला कोळवली वि.का.स.से. सोसायटीचे सचिव श्री. प्रदीप श्रीकृष्ण सावरकर व दुकान सेल्समन श्री.विश्वास विनायक खरे या दोघांबाबत ग्रामपंचायत सदस्य व तक्रारदार संतोष माने वगैरे तीन यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पायरीसडा या रेशन दुकानातून सध्याचे सेल्समन विश्वास खरे यांची दुकानामधून बदली केल्याशिवाय आम्ही धान्य घेणार नाही असा वाद होता. सदरच्या वादाबाबत मौजे पाचेरीसडा येथील ग्रामपंचायतीमध्ये तहसिलदार प्रतिभा वराळे यांच्या समुपदेशाने मिटविण्यात आला आहे. या बैठकीला जि.प. सदस्य महेश नाटेकर, पं.स. सदस्य रवींद्र आंबेकर, पोलीस पाटील, तलाठी, मंडळ अधिकारी, पुरवठा निरीक्षक सर्व गामस्य व महिला उपस्थित होत्या.
बैठकीमध्ये रास्त धान्य दुकान पाचेरीसडा या दुकानाच्या संदर्भात झालेल्या तक्रारीच्या अनुशंगाने तक्रारदार तसेच ग्रामस्थ यांचे निरसन करण्यात आलेले असून याबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार राहिलेली नाही व ग्रामस्थ रास्त धान्य दुकानामधून धान्याची उचल करणार आहेत, असे बैठकीच्या वेळी सांगण्यात आले. त्यानुसार बैठक झाल्याच्या दिवसापासून आजतागायत १६० कार्ड धारकांना माहे ऑगस्ट २०२१ चे धान्य वाटप पूर्ण करण्यात आलेली आहे. उर्वरीत शिधापत्रिकाधारकांचे धान्याचे वाटप पुढील चार दिवसात म्हणजेच दि. ५ सप्टेंबर २०२१ पूर्वी पूर्ण करण्याची हमी दुकानदार यांनी दिलेली आहे.

