खरे ढेरे भोसले कॉलेज राष्ट्रीय सेवा योजनाचा उपक्रम
गुहागर- खरे ढेरे भोसले महाविद्यालय गुहागर येथे २६ जानेवारी दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे अनोख्या पद्धतीने वृक्ष लागवड करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. निसर्गाचा समतोल राखून व पर्यावरणाचा ऱ्हास कमी करणे हा संदेश या दिनानिमित्त समाजाला देणे हा एक उपस्थितांना संदेश देण्यात आला. Tree planting on Republic Day
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अनिल.व्ही. सावंत यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली.Tree planting on Republic Day या प्रसंगी डॉ. डॉ. अनिल.व्ही. सावंत यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त अश्या उपक्रमाची खूपच आवश्यकता असल्याचे नमूद केले. भौगोलिक पर्यावरण संतुलित राहण्याकरिता वृक्ष लागवड अतिशय उपयुक्त असल्याचे त्यांनी सूचित केले. महाविद्यालयातील सर्व कर्मच्यार्यांनी प्रत्येकी एक झाड दत्तक घेऊन त्यांचे संगोपन व्यवस्थित केल्यास महाविद्यालय परिसर हरित होण्यास मदत होईल. असा आशावाद व्यक्त केला. या प्रसंगी सर्व शिक्षक शिक्षेकेतर कर्मचारी स्वयंसेवक यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली. Tree planting on Republic Day