प्रवाशांना सहन करावा लागतोय मनःस्ताप; गुहागर – चिपळूण बस सेवा ठप्प
गुहागर : एसटीच्या पाच संघटनांनी एकत्र येऊन विविध प्रलंबित मागण्यांसाठी आमरण उपोषण करत संप पुकारला आहे. त्याचा परिणाम गुरुवारी सकाळपासून दिसू लागला असून रत्नागिरी जिल्ह्यात एसटी सेवा सकाळपासून बंद झाली आहे. या संपाला कामगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. गुहागर – चिपळूण मार्गावरील वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. यामुळे शाळेचे विद्यार्थी, कर्मचारी व नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे.
Five organizations of ST came together a hunger strike has been called for various pending demands. ST service in Ratnagiri district has been closed since morning. The strike has received a spontaneous response from the workers. Traffic on Guhagar-Chiplun route has been disrupted. This has caused suffering to the students, staff and citizens of the school.
कोरोना काळात सर्वाधिक भरडल्या गेलेल्या एसटी कामगारांची भूमिका समजावून घेत त्यांना योग्य न्याय मिळावा यासाठी आता विविध संघटनांचे सभासद असलेले एसटी कामगार एकत्र आले आहेत. कालपासून राज्यभर आंदोलन सुरू केले आहे. रत्नागिरीत बुधवारपासून पाच संघटनांच्या कृती समितीने विभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्र एस टी कामगार संघटना, महाराष्ट्र एस टी कामगार सेना, महाराष्ट्र एस टी कामगार काँग्रेस, बहुजन राज्य परिवहन कर्मचारी संघटनांचा यात सहभाग आहे. या आंदोलनाला पाठिंबा देत अनेक कामगार यात सहभागी झाले. त्यामुळे गुरुवारी सकाळपासूनच रत्नागिरी जिल्ह्यातील एसटी वाहतूक ठप्प झाली आहे.
सकाळी मोजक्या फेऱ्या सुटल्या आणि त्यानंतर बंद झाल्यामुळे रत्नागिरी आगारातून एकही फेरी सुटली नाही. कामगारांच्या न्याय्य मागण्यासाठी संप, दुसऱ्या दिवशी गाड्या बंद झाल्या आहेत तर कालपासून राज्यातील एसटी सेवा विस्कळीत झाल्या आहेत. मात्र या बंदचा मोठ फटका प्रवाशांना बसला. त्यांची मोठी गैरसोय झाली. सकाळी गाड्या न सुटल्याने बाहेरगावी जाणाऱ्या लोकांचे हाल झाले. या बंद ची माहिती अनेकांना नव्हती त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. शाळांची विद्यार्थी, कॉलेज आयटीआय या मुलांची फार मोठी गैरसोय होत आहे.