गुहागर : उत्तर प्रदेशातील लखीमपुर दुर्घटनेच्या पार्श्वभुमीवर सर्व आघाड्यांवर अयशस्वी ठरलेल्या महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्यावतीने उद्या सोमवार दि. 11 रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. लखीमपुर दुर्घटनेचे आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही. मात्र महाराष्ट्रात शेतकरी नुकसान, साधु- संतांवरील अत्याचार, महिलांवरील अत्याचार अशा अनेक समाज विघातक घटना घडत असताना याबद्दल बोलायला महाविकास आघाडी तयार नाही. मात्र उत्तर प्रदेशातील लखिमपुर येथील घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रात महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. कोरोना संकटातून सावरणाऱ्या व्यापारी वर्गावर महाराष्ट्र बंदसाठी जबरदस्ती करू नये, असे गुहागर तालुका भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी म्हटले आहे.
On the backdrop of the Lakhimpur tragedy in Uttar Pradesh, the Mahavikas Aghadi of Maharashtra, which failed on all fronts, on Monday Maharashtra bandh has been called on 11th.
उत्तर प्रदेशात योगीजींच्या नेतृत्वातील भाजप सरकार सत्तेत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार स्वतःच्या राजकारणासाठी जनतेला वेठीस धरत आहे. गेली दोन वर्ष कोरोना कालखंड, तौक्ते वादळ, पुरस्थिती, परतीच्या पावसाचे थैमान यातुन व्यापारीवर्ग सावरत असताना शेतकऱ्यांना पीक विमा देणे, नुकसान भरपाई देणे, पुरग्रस्तांना नुकसान भरपाई देणे, समाज विघातक घटनांमध्ये भरडलेल्या महाराष्ट्रातील बंधु-भगिनींना धीर देणे या गोष्टी करायच्या सोडुन उत्तर प्रदेशातील घडलेल्या घटनेचा निषेध म्हणून महाराष्ट्र बंद करायचा हे काही संयुक्तिक नाही आणि म्हणूनच गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने तालुक्यातील व्यापारी वर्गाला जाहीर आवाहन करण्यात येत आहे की, महाविकास आघाडीच्या या ढोंगीपणाच्या बंदला आपण प्रतिसाद देऊ नये व या बंद साठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी व्यापारी वर्गावर जबरदस्ती ही करू नये, असे आवाहन गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी केले आहे.