• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांची गर्दी

by Ganesh Dhanawade
December 31, 2021
in Travel
17 0
0
Tourist Crowd in Guhagar

Tourist Crowd in Guhagar

33
SHARES
93
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागरमध्ये आठ दिवस पर्यटक आणि पर्यटनाचा महोत्सव

गुहागर, ता. 31 : पाच दिवसांचा आठवडा, नाताळच्या सुट्टीला जोडून आलेल्या शनिवार, रविवारच्या सुट्ट्या, दोन वर्षांनंतर खुली झालेली मंदिर, लसीचे दोन डोस झाल्याने मिळालेला आत्मविश्र्वास अशा विविध कारणांनी गेले आठवडाभर गुहागरमध्ये पर्यटनाचा महोत्सव सुरु आहे. Tourist Crowd in Guhagar

Tourist Crowd in Guhagar
Tourist Crowd in Guhagar

मुंबई, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर, अहमदनगर, औरंगाबाद,  आदी महाराष्ट्रातील शहरांबरोबरच मध्यप्रदेश, गुजराथ, कर्नाटक आदी राज्यातून पर्यटक गुहागरमध्ये येत आहेत. शहरातील अनेक पर्यटन संकुले गेले आठ दिवस हाऊसफुल आहेत. गुहागरच्या समुद्रावरही गर्दी पहायला मिळत आहे. बाजारपेठेतील अरुंद रस्त्यामुळे पर्यटकांसह स्थानिकांनाही वहातूक कोंडी सहन करावी लागत आहे. Tourist Crowd in Guhagar

कोरोना महामारीतील दोन वर्ष ठप्प असलेला पर्यटन व्यवसाय पुन्हा सुरू झाला आहे. वहातूक कोंडी, दुरुस्तीमुळे गुहागर चिपळूण रस्त्याची झालेली दुरावस्था याकडे दुर्लक्ष करुन पर्यटक गुहागरात दाखल होत आहेत. पर्यटन व्यावसायिकांसह अन्य नागरिकही या पर्यटकांचे स्वागत करत आहे. Tourist Crowd in Guhagar

Tourist Crowd in Guhagar
Tourist Crowd in Guhagar

2021 या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी गुहागरच्या समुद्रावर रात्री देखील गर्दी पहायला मिळत आहे. खऱ्या अर्थाने कोरोनानंतर पर्यटन व्यवसायाने उभारी घेतल्याचे समाधानकारक चित्र आज गुहागरमध्ये पहायला मिळाले. Tourist Crowd in Guhagar

Tags: Breaking NewsGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsLocal NewsMarathi NewsNews in GuhagarTop newsTourist Crowd in Guhagarगुहागर न्यूजगुहागरच्या बातम्याताज्या बातम्यामराठी बातम्यास्थानिक बातम्या
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.