ओघळलेले मोती; ज्ञानरश्मि वाचनालयात होणार सोहळा
गुहागर : येथील कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापिका असलेल्या सौ. मनाली बावधनकर यांनी ओघळलेले मोती हे ललिल कथांचे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन उद्या शनिवारी 23 ऑक्टोबरला गुहागरमध्ये होत आहे. तरी या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला तालुक्यातील साहित्यप्रेमींनी उपस्थित रहावे. असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषद गुहागर शाखेचे अध्यक्ष राजेंद्र आरेकर यांनी केले आहे.
Manali Bavdhankar, a professor in a junior college, has written a book of beautiful stories called ‘Oghalelele Moti’. The book is being published tomorrow, October 23 in Guhagar. However, this book release ceremony should be attended by literary lovers from the taluka. This appeal has been made by Rajendra Arekar, President of Maharashtra Sahitya Parishad Guhagar Branch.
आपल्या आजुबाजुला घडणाऱ्या छोट्या घटनांचाही आपल्यावर चांगला वाईट परिणाम होत असतो. याचे प्रतिबिंब प्रा. मनाली बावधनकर यांनी ओघळलेले मोती या पुस्तकात शब्दबद्ध केले आहे. लोकमान्य टिळक वाचनालयाचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे यांची या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे. या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्र साहित्य परिषद गुहागर शाखा, सार्वजनिक ज्ञानरश्मि वाचनालय आणि गुहागर न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. उद्या शनिवारी 23 ऑक्टोबरला सायंकाळी 5 ते 7 या वेळेत हा प्रकाशन सोहळा डॉ. तानाजीराव चोरगे सभागृह, ज्ञानरश्मि वाचनालय गुहागर येथे होणार आहे. दापोलीतील गझलकार प्रा. कैलास गांधी यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी गुहागरच्या तहसिलदार सौ. प्रतिभा वराळे, ज्येष्ठ साहित्यिक अरुण इंगवले, सौ. मनिषा दामले, राष्ट्रपाल सावंत हे उपस्थित रहाणार आहेत.