गुहागर तालुका भाजपतर्फे तहसीलदारांना निवेदन
गुहागर : तालुक्यातील नापता असणार्या आणि मृतदेह मिळालेल्या खलाशांच्या कुटुंबांना तात्काळ अर्थसहाय्य मिळावे, अशी मागणी गुहागर तालुका भाजपच्यावतीने तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.
Immediate financial assistance should be given to the families of the sailors who have been found dead in Guhagar taluka. Such a demand has been made to the tehsildar on behalf of Guhagar taluka BJP.
26 ऑक्टोबर 2021 रोजी मच्छीमारीसाठी गेलेली रत्नागिरी तालुक्यातील जयगड बंदरातील नासीर हुसेनमीया संसारे यांच्या मालकीची नावेद – 2 ही बोट आज तगायत परतलेली नाही. या बोटीवरती एकूण सात खलाशी होते. त्यापैकी सहा खलाशी हे गुहागर तालुक्यातील होते. या सहा खलाश्यांमधील अनिल गोविंदा आंबेरकर (साखरी आगर) यांचा मृतदेह मिळाला असून त्याची कुटुंबाला ओळख पटली आहे. तर दगडू तांडेल, गोकुळ नाटेकर (साखरी आगर, सुरेश कांबळे (हेदवी), दत्तात्रय झगडे (अडूर), अमोल जाधव (मासु) हे पाच खलाशी अद्याप बेपत्ता आहेत. बेपत्ता असणार्या खलाशांचा शासनाच्या सर्व स्तरातून, समाज बांधवांकडून समुद्रात शोधकार्य सुरू आहे. सातपैकी एका खलाशाचा मिळालेला मृतदेह लक्षात घेता उर्वरित सहा खलाशी जीवीत असण्याची शक्यता फारच धुसर असल्याची चर्चा सर्व मच्छीमार बांधवांनामधुन होत आहे. या सहाही खलाशांच्या घरची परिस्थिती फारच बेताचे आहे. या व्यक्तींच्या कमाईवरच या सर्वांचे कुटुंब उदरनिर्वाह चालत होते. या सर्व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मृत पावलेल्या व बेपत्ता असलेल्या गुहागर तालुक्यातील खलाशांच्या कुटुंबांना शासनाच्या वतीने तात्काळ आपत्ती व्यवस्थापनांमधुन आर्थिक सहकार्य मिळवुन देण्याची मागणी गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष निलेश सुर्वे यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे यांच्याकडे केली आहे.
गुहागर तालुक्याच्या कार्यतत्पर तहसीलदार सौ.प्रतिभाताई वराळे यानी साखरी आगर येथील मृत खलाशाच्या कुटुंबाला भेट देऊन त्यांचे सांत्वन केले. त्याचबरोबर दु:खाचा डोंगर कोसळलेल्या आंबेरकर कुटुंबाला शासकीय योजनांचा लाभ मिळवुन देण्यासाठी प्रयत्नशील रहाणार असल्याचे सांगीतले आहे. तसेच तालुक्यातील समुद्रकिनारी अथवा खाडीकिनारी जयगड तालुक्यातील बेपत्ता झालेल्या नावेद 2 या बोटीचे किंवा बोटीवरील मालमत्तेचे अवशेष सापडल्यास त्याची माहिती तात्काळ गुहागर पोलीस स्थानकात देण्याचे आवाहन तहसीलदार सौ. वराळे, तालुका पोलीस निरीक्षक ए. पी. जाधव, उपनिरीक्षक दिपक कदम यानी केले आहे.