आरोपींच्यावतीने ॲड. संकेत साळवी यांनी काम पाहिले.
गुहागर : आंतरराष्ट्रीय बाजारात दोन कोटीहून अधिक किंमत असलेल्या व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करत असताना गुहागर तालुक्यातील वेळंब येथे तिघांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केले होते. या तस्करी प्रकरणी आरोपींच्यावतीने ॲड. संकेत साळवी यांनी काम पाहिले.
Smuggling of whale vomit worth over Rs 2 crore in the international market While doing so, three persons were arrested by the forest department officials at Velamb in Guhagar taluka. On behalf of the accused in this smuggling case, Adv. Sanket Salvi oversaw the work.
वन विभागाला मिळालेल्या माहितीनुसार वेळंब येथे तोफिक अलवारे, अब्दुल मजीद तांबे व चंद्रकांत काताळकर हे सुमारे दोन किलो वजनाची व्हेल माशाची उलटी तस्करी करण्याकरता आणत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. त्यानंतर वनविभागाच्या परिक्षेत्र वन अधिकारी श्रीमती राजेश्री किर यांनी दि. २१ ऑक्टोबर रोजी सापळा रचून तिघांनाही रंगेहाथ ताब्यात घेतले. या तिघांना न्यायालयाने 25 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान, आज त्यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर केले असता चंद्रकांत काताळकर यांचे वतीने ॲड. संकेत साळवी यांनी युक्तिवाद करताना वन अधिकाऱ्यांच्या तपास पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आरोंपीकडून जप्त केलेली वस्तू ही व्हेल माशाची उलटीच आहे असे दाखवणारा कोणताही प्रथमदर्शनी पुरावा वन अधिकारी समोर आणू शकले नाहीत असा युक्तिवाद ॲड. संकेत साळवी यांनी केला. आत्तापर्यंत झालेल्या तपास कामाचे अवलोकन करून आज गुहागर न्यायालयाने तिन्ही आरोपींना जामीनावर मुक्तता करण्याचे आदेश केले.