• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

IPL मध्ये येणार दोन नवीन संघ

by Ganesh Dhanawade
June 30, 2021
in Old News
16 0
0
IPL मध्ये येणार दोन नवीन संघ
31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

BCCI कमावणार ५८,०० कोटी !

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सुरू झाल्यापासून बीसीसीआयने आर्थिक आघाडीवर यशाचे झेंडे उंचावले आहेत. कोरोना काळात इतर मंडळ क्रिकेटपटूंचे मानधन कापत असताना बीसीसीआयने याउलट काम केले आहे. आता बीसीसीआयची तिजोरी पुन्हा भरली जाणार आहे, कारण आयपीएलच्या पुढील हंगामासाठी बीसीसीआय दोन नवीन संघ स्पर्धेत आणणार आहे, ज्यांची किंमत तुम्हाला आश्चर्यचकित करू शकते.
क्रिकबझच्या अहवालानुसार इंडियन प्रीमियर लीगच्या नव्या टीमची बेस प्राइस सुमारे १८०० कोटी रुपये असू शकते, परंतु बोली लावल्यामुळे या टीमचे मूल्य २२०० ते २९०० कोटीपर्यंत जाईल. पाच वेळा आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्सची किंमत २७०० ते २८०० कोटी रुपये आहे तर, चेन्नई सुपर किंग्ज २२००-२३०० कोटींची टीम आहे. त्याचबरोबर राजस्थान रॉयल्सची किंमत १८५५ कोटी रुपये आहे.आयपीएलच्या दोन नव्या संघांचा लिलाव पुढच्या महिन्यात जुलैमध्ये होऊ शकतो. बीसीसीआय यावर काम करत आहे. आयपीएल २०२२मध्ये खेळणारी एक नवीन टीम अहमदाबादची असू शकते. जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियमही अहमदाबाद येथे बांधले गेले आहे. आयपीएल २०२१चे काही सामनेही येथे खेळले गेले. गुजरात लायन्सही आयपीएलचा एक भाग होती. उत्तर प्रदेशचा संघही आयपीएल २०२२ मध्ये येऊ शकतो. आठपेक्षा अधिक संघ आयपीएलमध्ये भाग घेण्याची ही पहिली वेळ नाही. २०११ मध्ये १० संघांनी स्पर्धेत भाग घेतला होता तर, पुढील दोन हंगामात नऊ फ्रेंचायझींचा सहभाग होता.

Tags: BCCICoronaCorona In GuhagarCorona NewsCovid19GuhagarGuhagar NewsIPLMarathi NewsNews in Guhagarआयपीएलइंडियन प्रीमियर लीगकोरोनाकोरोना बातम्याकोविड केअर सेंटरगुहागरातील कोरोनाटॉप न्युजताज्या बातम्याबीसीसीआयमराठी बातम्यालोकल न्युज
Share12SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.