खा. रामदास तडस यांचे प्रतिपादन
गुहागर : कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या तीन जिल्ह्यात आम्ही तेली समाज युवक संघटना रत्नागिरी यांच्यावतीने ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून अभिव्यक्ती स्वातंत्र्याला व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या स्पर्धेच्या तीन गटांमध्ये दोन वर्षे ते ७० वर्षे वयोगटातील स्पर्धक सहभागी झाले होते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर सद्याच्या कोरोना आपत्कालीन परिस्थितीत ऑनलाइन स्पर्धेच्या माध्यमातून समाजाला संघटित करून समाजोपयोगी विचार मांडण्याचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम संघटनेने केले. त्यांचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्शवत आहे. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे कोकण अध्यक्ष सतीश वैरागी यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणातील युवकांचे संघटन मजबूत होत असून त्यांचा आदर्श महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांनी घ्यावा, असे मत महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष, वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांनी केले.
माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपक्रमाचे कौतुक करताना युवकांनी समाज संघटनेमध्ये अधिकाधिक सक्रिय होऊन आपले योगदान द्यावे, असे आवाहन केले. महासचिव डॉ. भूषण कर्डिले यांनी कोकणातील समाज बांधवांशी संवाद साधला. यावेळी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यातील समाज बांधव डिजिटल माध्यमातून सहभागी झाले होते. यावेळीआम्ही तेली समाज युवक संघटना आयोजित वत्कृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून खासदार रामदास तडस, महासचिव डॉ.भुषणजी कर्डिले, माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कोकण अध्यक्ष सतीश वैरागी, कार्याध्यक्ष अशोक व्यवहारे, सुनिल चौधरी, साहित्यिक अरुण इंगवले, परीक्षक चंद्रकांत झगडे, विनायक राऊत, प्रभाकर खानविलकर, संतोष तेली, रघुवीर शेलार, संतोष रहाटे यांसह आम्ही तेली समाज युवक संघटनेचे सर्व पदाधिकारी व ज्ञाती बांधव डिजिटल माध्यमातून कार्यक्रमात उपस्थित होते.
या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून खुला गटामध्ये प्रथम क्रमांक – सौ. स्वप्नाली विजय वाडेकर, द्वितीय क्रमांक – कु. राजस अविनाश कदम, तृतीय क्रमांक – श्री. प्रथमेश सुधाकर रहाटे, उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक – सौ. अरुणा अरुण इंगवले, उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक – सौ. स्नेहल संदिप रहाटे, १२ वर्षाखालील गटामध्ये प्रथम क्रमांक – कु. गार्गी संजय बाकाळकर, द्वितीय क्रमांक – कु. सारा योगेश वनकर, तृतीय क्रमांक – कु. मुग्धा संजय राऊत,चौथा क्रमांक – कु. निधी संदिप पवार, पाचवा क्रमांक – कु. देवांश राजन देवळेकर,सहावा क्रमांक – कु. शार्दुल प्रविण धोत्रे, सातवा क्रमांक – कु. दया संदिप पवार यांनी प्राप्त केला.
७ वर्षाखालील गटामध्ये प्रथम क्रमांक – कु.अर्णव संजय बाकाळकर, द्वितीय क्रमांक – कु. सोहम जितेंद्र कदम, तृतीय क्रमांक – कु. प्रसाद महेश रसाळ, चौथा क्रमांक – कु. आराध्या अमोल पवार, पाचवा क्रमांक – कु. आरोही गणेश राऊत, सहावा क्रमांक – कु. तन्मय प्रमोद महाडिक, सातवा क्रमांक – कु. श्रीयोग संजय राऊत यांनी सुयश संपादन केले. सर्व विजेत्यांना मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. विजेत्या व सहभागी सर्व स्पर्धकांचे संघटनेच्या माध्यमातून अभिनंदन करण्यात आले.