गुहागर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या कामबंद आंदोलनास रिपब्लिकन पार्टी अॉफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी दिलेल्या आदेशाप्रमाने रिपब्लिकन पार्टी अॉफ इंडिया (आठवले) तालुका गुहागरने जाहिर पाठींबा दिला असून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचा-यांच्या न्याय हक्कासाठी भविष्यात रिपब्लिकन पक्ष रस्त्यावर उतरेल असा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.
As per the order given by the leader of Republican Party of India Ramdas Athavale to the strike called by the employees of Maharashtra State Transport Corporation. Republican Party of India (Athavale) Taluka Guhagar has given public support and warned in a statement that Republican Party will take to the streets in future for the right of employees of Maharashtra State Transport Corporation.


या निवेदनावर रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा प्रवक्ते अनंत पवार, तालुकाध्यक्ष संदिप कदम, सरचिटणीस सुनिल गमरे, तालुका युवाध्यक्ष विजय असगोलकर, तालुका उपाध्यक्ष भिमसेन सावंत, कार्यकारणी सदस्य सुरेश जाधव, वैभव पवार, संदिप पवार यांच्या सह्या आहेत. कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरू याची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकारवर राहील असे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नावे गुहागरच्या तहसिलदार सौ. प्रतिभा वराळे, पोलिस निरिक्षक पोलिस ठाणे गुहागर यांना देण्यात आले आहे.

