श्री सिद्धांत यशवंतराव तेजोमय (वास्तुशास्त्र अभ्यासक) यांचा हा लेख व्हॉटसॲपवर आला होता. तो आवडला म्हणून शेअर करत आहोत.
एक ते नऊ या अंकात संपूर्ण ब्रम्हांडाचे सार लपलेले आहे. आकाश मंडळातील मुख्य ग्रहांची संख्या सुद्धा नऊ आहे. ज्याप्रमाणे ग्रह मानवी जीवनावर प्रभाव टाकतात त्याचप्रमाणे प्रत्येक अंकांचा आपल्या जीवनावर व भौतिक परिस्थितीवर प्रभाव असतो. प्रत्येक व्यक्ती ग्रह आणि अंक यांच्या प्रभाव दशेत जन्म घेतो आणि प्रत्येक क्षणाला ग्रह आणि अंकाचा प्रभाव व्यक्तीवर असतो.
अंक शास्त्राचे मूळ हे भारतीय ज्योतिष शास्त्रावर अवलंबून आहे. अंकशास्त्रानुसार तुमचा भाग्यशाली अंक कोणता आहे व भाग्यंकानुसार दिवस, महिना, वर्ष कोणते शुभ असेल, कोणते रत्न व रंग शुभ असेल, त्यानुसार आपण आपले भाग्य व भविष्यात नक्कीच सकारात्मक बदल करू शकतो.
जन्मतिथी नुसार व्यक्तीचे चरित्र, स्वभाव, क्षमता, संभावना, स्वास्थ्य आणि महत्त्वपूर्ण कार्यांचे वर्णन केले जाते, त्याचप्रमाणे प्रत्येक तिथी व वेळेनुसार म्हणजेच ग्रह दशेनुसार काय प्रभाव असेल याचे वर्णन केले जाते, आठवड्यातील सातही दिवसांचा संबंध सात ग्रहांशी आहे. अंक, ग्रह आणि राशी यांचा गुढ संबंध आहे.
जन्मतारखेवरून मुलांक व भाग्यांक माहीत होतो त्याचप्रमाणे राशीनुसार भाग्यांक माहीत होतो, जन्मतारखेपेक्षा राशीचा अंक सर्वात जास्त प्रभावशाली असतो.
मी वयाच्या पंधराव्या वर्षापासून म्हणजेच 1995 पासून अंकशास्त्र आणी वास्तुशास्त्र या विषयांचा अभ्यास करीत आहे. वास्तुशास्त्रासहित अंकशास्त्राचे मार्गदर्शन करतो, बहुतेक लोकांना आर्थिक समस्या असतात, अंकशास्त्रानुसार तुमचा मोबाईल क्रमांक, वाहन क्रमांक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा बँक अकाऊंट क्रमांक कोणता असावा याचा फार मोठा प्रभाव असतो.
आज आपण 24 या अंकाचे विश्लेषण करणार आहोत.
2 + 4 = 6 = शुक्र : आधुनिक काळ हा राहू आणी शुक्र ग्रहाच्या अंतर्गत येतो. मौज, मजा, मस्ती, खाणे, पिणे, फिरणे, रंगबिरंगी कपडे, महागडी घड्याळं, गॉगल, दागिने, सौंदर्य, प्रेम आणि स्वैराचार हे सर्व शुक्र ग्रहाच्या अंतर्गत येतात. शुक्र म्हणजे कामदेवाचे प्रतीक आहे. पृथ्वीवरील समस्त प्राण्यांची कामवासना नियंत्रित करण्याचे कार्य शुक्र करतो. याच ग्रहामुळे कामवासना जागृत होते व वाढते.
24 तारखेला जन्मलेल्या व्यक्ती नेहमी हसतमुख असतात. याच कारणाने ते सर्वांना आपलेसे करतात. त्यांच्या मनातले रहस्य जाणणे फार कठीण असते. स्वभावत: चंचल असल्याने एकाच गोष्टीवर टिकून नाही राहत. फिरण्याची आवड असते आणि याच प्रकारच्या कामात यशस्वी होतात. सफेद रंगाचे वस्त्र यांना फार आवडते आणि सफेद रंगाच्या वस्त्रात ते खुलून दिसतात. यांना राग आल्यास कोणत्याही प्रकारचा विरोध सहन करत नाही.
24 अंक वाल्या व्यक्ती मनापासून प्रेम करतात, ज्याच्यावर प्रेम करतात त्याच्यासाठी सर्वकाही करायची तयारी असते. मित्रांचे स्वागत सत्कार करण्यात यांना प्रसन्नता वाटते. या व्यक्ती एकप्रकारे हट्टी व दृढनिश्चयी असतात, जे कार्य हाती घेतात त्या प्रती समर्पित असतात. या व्यक्ती मूळचे कलाप्रेमी असतात. संगीत, नृत्य, वाचन व फिरणे यांना फार आवडते.
24 या अंकात 2, 4 व 6 असे तिन अंक येतात. आपण या तीनही अंकांचे गुणधर्म पाहू.
2 = चंद्र : मनाचा कारक, शांतता, संयम, सुंदरता व चंचलता.
4 = राहु : आधुनिक काळ, तर्कनिष्ठ, चिकित्सक, योजनाबद्ध व स्पष्टवक्ता
6 = शुक्र : सौंदर्य, सहयोगी जबाबदार व शृंगार
2, 4 व 6 हे अंक एकमेकांशी सुसंगत अंक आहेत. तुमची कोणत्याही महिन्यातील जन्मतारीख 24 येत असेल तर तुमचा मुलांक 6 आहे. तुमच्यात नक्कीच यशस्वी आणि श्रीमंत बनण्याची क्षमता आहे. फक्त तुम्हाला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. 24 हा अंक तुमच्या जीवनातील मार्गदर्शक अंक आहे.
24 तारखेला जन्मलेल्या व्यक्ती
सचिन तेंडुलकर, मोहम्मद रफी, मनोज कुमार, सिद्धांत तेजोमय, सुभाष घई, वरूण धवन, सम्राट अकबर, जॉर्ज द्वितिया, फ्रेडरिक महान व किंग जोन्स प्रथम.
24 जन्मतारीख असणाऱ्या व्यक्तींनी काय करू नये
24 अंक असणाऱ्या व्यक्तींनी बदल्याची भावना घेऊ नये. बदल्याची भावना आपल्या लक्ष्यापासून विचलित करते. प्रत्येक गोष्टीवर अडून राहू नये. दुसऱ्यांच्या तर्कांना सुद्धा मान द्यावा. प्रत्येक व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास ठेवू नये व अंगावर चरबी वाढू देऊ नये.
घरात वादविवाद असेल तर दक्षिण दिशेला लाल पेपर वर निळ्या रंगाने 24 क्रमांक लिहून भिंतीवर फ्रेम करून लावा किंवा चिटकवा. हा अंक मोबाईल स्क्रीनवर ठेवला तरी त्याचा उपयोग होतो. कोणताही उपाय करण्यापूर्वी घरातील वास्तुदोष, कुळदेवतादोष व पितृदोष दूर करावेत याने शक्यतो आपली बहुतेक कार्ये सफल होतात.
शुभ रंग : आकाशी, निळा, सफेद
शुभ रत्न : हिरा, झिरकॉन
शुभ वस्त्र : सफेद
शुभ वार : शुक्रवार
शुभ देवता : महालक्ष्मी देवी
(24 अंकाच्या व्यक्तीने लग्न किंवा चंद्र रास मकर किंवा कुंभ येत असेल तर काळ्या व निळ्या रंगाचे कपडे वापरू नये)
शुभं भवतू
श्री सिद्धांत यशवंतराव तेजोमय.
(1995 पासून वास्तुशास्त्र अभ्यासक, अंकशास्त्र तज्ञ, हस्ताक्षर तज्ञ, एंजल आणि टॅरोट कार्ड रीडर.)
मोबाईल क्रमांक : 7045192507
गुहागर न्यूजच्या बातम्या वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. आणि आमच्या व्हॉटसॲप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
https://chat.whatsapp.com/IUsR8JabqUYDVQj1f1Nl58