सभापती सुनील पवार यांचे प्रतिपादन
गुहागर : आपल्या देशात महिलांचा प्राचीन काळापासून सन्मान केला जात होता. महिलांचा आदर करून त्यांच्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. सावित्रीच्या लेकी आज कर्तुत्ववान बनल्या असून सर्व क्षेत्रात त्यांचा मुक्त संचार आहे. स्त्रियांची प्रगती हीच खरी देशाची शान असून त्यांचा सन्मान करून बलशाली भारत घडवूया, असे प्रतिपादन गुहागरचे पंचायत समिती सभापती सुनील पवार यांनी केले.
गुहागर तालुक्यातील वेलदूर नवानगर शाळेत सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानतर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पंचायत समिती सदस्य स्मिता धामणस्कर, माजी उपसभापती विठ्ठल भालेकर, गटशिक्षणाधिकारी वामन जगदाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक कदम, सरपंच रामचंद्र डांगे, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीम. भागवत, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा स्नेहल रोहीलकर, मुख्याध्यापक मनोज पाटील, सदस्या सीमा रोहिलकर, ऋतुजा रोहीलकर, ग्रामविकास अधिकारी कुळये, सुधाकर कांबळे, मारुती रोहिलकर, संदीप वानरकर, सुदाम कोलथरकर, देवराम भोसले, शंकर कोलथरकर आदी उपस्थित होते.
यावेळी आदर्श मातांचा सन्मान करण्यात आला. तसेच कोरोना योद्ध्यांचा यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सभापती सुनील पवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या सत्कारामध्ये आदर्श माता सुरेखा कोलथरकर, माता वानकर, दीपज्योती भोसले, सीमा रोहीलकर, अंगणवाडी सेविका मत्स्यगंधा कोलथरकर, सोनिया नाटेकर, सीमा रोहीलकर, ऋतुजा रोहिलकर, अस्मिता नाटेकर, शिक्षण विस्तार अधिकारी भागवत, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कदम, पोलीस कर्मचारी वरेकर, सत्वशीला जगदाळे, पल्लवी घुले, अंजली चप्पलवार, निलोफर शेख, माधवी पाटील, सुवर्णा कोलथरकर, विशाखा नाटेकर, मारुती रोहीलकर, सुधाकर पवार, सोनाली वानकर, प्रा. सदानंद पवार, विशाखा रोहीलकर, किरण सूर्यवंशी आदींचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच रामचंद्र डांगे होते. सूत्रसंचालन शेख मॅडम यांनी केले.