आ. भास्करराव जाधव यांचे प्रतिपादन
गुहागर : गेल्या काही महिन्यात गुहागर तालुक्यातील आणि गावातगावातून इतर पक्षातील अनेक जण आता परत शिवसेनेत येत आहेत. हे प्रमाण मागील विधानसभा निवडणुकीच्या मतदानापेक्षा अधिक आहे. गुहागरातील जनता ही नेहमीच विकासाला महत्त्व देत असून विकास करण्याच्या पाठीशी कायम ठामपणे उभी राहते हे अनेकवेळा सिद्ध झाले आहे, असे प्रतिपादन आमदार भास्करराव जाधव यांनी केले.
In the last few months, many people from other parties from Guhagar taluka and villages are now returning to Shiv Sena. This is higher than the turnout in the last Assembly elections. MLA Bhaskarrao Jadhav stated that the people of Guhagar have always attached importance to development and have always stood firmly behind the development.
तालुक्यातील येथील आरे, धोपावे व वरवेली येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन आ. जाधव यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी धोपावे येथील हनुमानवाडी, ब्राह्मणवाडी व कोळकेवाडी या तीन वाडीतील ग्रामस्थ हनुमान मंदिरात एकत्रित आले होते. या सर्वांनी आ. भास्कर जाधव यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते. संपूर्ण धोपावे गावासाठी नळपाणी योजना मंजूर झाली असून ती तब्बल ७ कोटी रुपयांची आहे. रानवी, धोपावे व वेलदूर या गावातील मुख्य रस्ता मंजूर झाला असून त्याचे कामहि आता लवकरच सुरू होणार असल्याचे सांगितले.
त्यानंतर आरे येथील लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये आरे कलमवाडी, धोपटवाडी व पारदळेवाडीतील लोकांनी आ. जाधव यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, तालुकाप्रमुख सचिन बाईत, सभापती पूर्वी निमुणकर, शिवसेना युवा अधिकारी अमरदीप परचुरे, विनायक मुळे, समीर घाणेकर, बाबा भोसले, बंड्या देवकर, शरद यादव, सुभाष घडवले, प्रशांत भोसले, सतीश शेटे आदी उपस्थित होते.
यावेळी आ. जाधव म्हणाले की, यापूर्वी अंजनवेल जि. प. गट व पं. स. गण हे राजकीय दृष्ट्या शिवसेनेला अडचणीचे होते. परंतु, गेल्या दोन वर्षांपूर्वी हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. या गटात आता शिवसेनेचे वर्चस्व आहे. गुहागर तालुक्यातील लोक हे विकासकामांना प्राधान्य देणारे आहेत. लोक विकासकामे करणाऱ्यांच्या मागे ताकदीने उभे राहतात, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. आरे गावातील जनता भविष्यात शिवसेनेच्या मागे खंबीरपणे उभी राहीलेली दिसेल, असा विश्वास आ. जाधव यांनी व्यक्त केला.