गणेश कदम यांचे आ. जाधवांना साकडे
गुहागर : गुहागर तालुक्यातील काताळे कदमवाडी (मराठवाडी) गेली कित्येक वर्षे मूलभूत सुविधांपासून वंचित राहिली आहे. या वाडीत ना रस्ता, ना पथदिप, ना नळपाणी योजना, ना कुठचा विकास झाला आहे. याला कारण फक्त या वाडीची कमी असलेली लोकसंख्या.. त्यामुळे येथे मतदानही फार कमी मिळते. त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षाने वा नेत्याने या वाडीच्या विकासासाठी प्रयत्न केलेले नाही. त्यामुळे गेली अनेक वर्षे या वाडीतील ग्रामस्थांना दोन किलोमीटर अंतराची पायपीट करावी लागत आहे. या रस्त्याला निधी मिळावा म्हणून मनसेचे गुहागर तालुका संपर्क प्रमुख गणेश कदम यांनी आ. भास्करराव जाधव यांना साकडे घातले आहे.
Katale Kadamwadi (Marathwadi) in Guhagar taluka has been deprived of basic facilities for the last several years. The only reason for this is the low population of this wadi .. so the turnout here is very low. Therefore, no political party or leader has made any effort for the development of this village. MNS’s Guhagar taluka liaison chief Ganesh Kadam has put Bhaskarrao Jadhav in a cage to get funds for the road.
मराठवाडीत अवघे ११ घरे आहेत. त्यातील ३ घरे बंद आहेत. चालु असलेल्या ८ घरामध्ये १८ ते २० लोक राहतात. त्यापैकी १४ ते १५ लोक मतदान करतात. मतदान कमी असल्याचा फटका या वाडीच्या विकासावर होत आहे. या वाडीत रस्ता नसल्याने आजारी पडलेल्या व्यक्तीस खुर्ची, डोली किंवा गोदडित भरून अंदाजे दीड ते दोन किलोमीटर चढ उताराच्या भागातून मुख्य रस्त्यावर आणून त्यानंतर गाडी करून डॉक्टरकडे न्यावे लागते. अनेक वेळा नेतनाच रुग्ण दगावतो. अशी भयानक परिस्थिती या वाडीची आहे.
मुख्य रस्त्यापासून ही वाडी अंदाजे दोन किमी अंतरावर आहे. व याच वाडीच्या पुढे भैरी ग्रामदेवतेचे जागृत मंदिर देखील आहे. रस्त्ता नसल्या कारणाने गावाबाहेरील भक्त नागरीकांना दर्शनासाठी येण्यासही फार त्रास सहन करावा लागतो. या रस्त्याचे डांबरीकरण होण्यासाठी या वाडीच्या वतीने अनेक वेळा लोकप्रतिनिधी यांना निवेदन देण्यात आली. परंतू मतदान कमी होत असल्याने विविध कारणे देत या वाडीला विकासापासून दूर ठेवण्याचे काम लोकप्रतिनिधी यांच्याकडून होत आहे. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य महेश नाटेकर देखील याच गावचे आहेत. तरीही ही वाडी मूलभूत सुविधांपासून वंचित राहिली आहे. आ. जाधव यांनी येथील रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून घ्यावा, अशी मागणी करणार असल्याचे मनसे संपर्क प्रमुख गणेश कदम यांनी सांगितले.