भाजप तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांचे मंत्री नारायणराव राणे यांना निवेदन
गुहागर : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्यावतीने २०१९ साली गुहागर तालुक्यातील तवसाळ पडवे परिसरात मेगा लेदर आणि फुटवेअर उद्योग उभारणीसाठी तत्वतः मान्यता देण्यात आली होती. मात्र यानंतर काही तांत्रिक अडचणीमुळे या प्रकल्पाला गती मिळू शकली नाही. वाणिज्य मंत्रालयातून तत्त्वतः मान्यता मिळाली असल्याने रोजगार निर्मितीच्या या मेगा लेदर आणि फुटवेअर क्लस्टरला गती मिळण्यासाठी नक्की प्रयत्न करणार असल्याचे राणे यांनी सांगून याबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी व या उद्योग निर्मितीला गती देण्याकरता जिल्हाध्यक्षा डॉ. विनय नातू यांच्यासह दिल्लीत येण्याचे निमंत्रण ना. राणे यांनी दिले आहे.
In 2019, the Union Ministry of Commerce had given in-principle approval for setting up a mega leather and footwear industry in Tavasal Padve area of Guhagar taluka. However, due to some technical difficulties, the project could not gain momentum.
जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने चिपळूण येथे केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे आले असताना गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष नीलेश सुर्वे यांनी ना. राणे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन याबाबतचे निवेदन दिले. यावेळी आम, प्रसाद लाड, जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातु उपस्थित होते. त्यावेळी या प्रकल्पाबाबत सकारात्मक चर्चा झाली. जगात लेदर आणि फुटवेअर उत्पादन क्षेत्रात चीन देश आहे. त्यानंतर भारताचा नंबर लागतो. हा प्रकल्प गुहागर तालुक्यामध्ये उभा राहिल्यास तालुक्यात मेगा लेदर आणि फुटवेअर असे अनेक छोटे छोटे उद्योग उभे होतील. कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक होईल. अनेक रिकाम्या हाताना काम मिळून एक मोठी बाजारपेठ तयार होईल. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन निलेश सुर्वे यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांच्या मार्गदर्शनाने हा मेगा लेदर आणि फुटवेआर क्लस्टरचा उद्योग तवसाळ पडवे परिसरात उभारण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. राणे साहेबांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने गुहागर तालुक्यात ग्रामीण भागात रोजगाराचे एक नवे दालन उभे राहणार असल्याचे निलेश सुर्वे यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण शिगवण, ओबीसी जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर, मंगेश जोशी, सचिन ओक, दिनेश बागकर, विजय भुवड, संदीप साळवी, विनायक सुर्वे, रविंद्र अवेरे, शार्दूल भावे, दिपक मोरे, विजय मसुरकर आदी बहुसंख्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.