भाजपच्या दणक्याने रुग्णालय प्रशासन नरमले
गुहागर : संपूर्ण देश सध्या कोरोनाशी लढत आहे. कोरोनावर उपचार करणे गरिबांच्या हातात नाही. अशीच परिस्थिती गुहागर तालुक्यातील तळवली भेळेवाडीतील गरीब समीर सांगळे याच्या कुटुंबावर आली. मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांनी या कुटुंबाला आधार देत रुग्णालय प्रशासनाला तब्बल साडेचार लाख इतके झालेले बील माफ करायला लावून सामाजिक दायित्व दाखवले.
The whole country is currently fighting Corona. Treating corona is not in the hands of the poor. A similar situation happened to the family of poor Sameer Sangle of Talwali Bhelewadi in Guhagar taluka. However, the BJP workers supported the family and showed social responsibility by forcing the hospital administration to waive the bill of Rs 4.5 lakh.
गुहागर तालुक्यातील तळवली भेळेवाडीतील तरुण समीर सांगळे हा वसई येथील खाजगी रुग्णालयात कोरोनाशी झुंज देता देता अपयशी ठरला. समीर हॉस्पिटलमध्ये कोरोनाशी झुंज देत असल्याची माहिती मिळताच भाजप ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर आणि युवा भाजप कार्यकर्ते मनोज डाफळे या दोघांनीही आपली यंत्रणा वापरून व प्रत्यक्ष भेट देऊन जवळपास 4 लाख 40 हजार इतके रुग्णालयाचे बील माफ करून घेतले. अखेर वसई-विरारच्या भाजप कार्यकर्त्यांपुढे रुग्णालय प्रशासनाला नमावे लागले.
समीरची घरची परिस्थिती अतिशय गरिबीची आणि त्यातच प्रधानमंत्री योजनेतून त्यांचे नवीन घर बांधून नुकतेच पूर्ण झाले. जूनमध्ये समीर त्याच्या नवीन घराच्या घरभरणी करता येणार होता. मात्र नव्या घराचे त्याचे स्वप्न हे स्वप्नच राहिले. आधीच कर्जात बुडालेल्या समीरच्या घरच्यांना हॉस्पिटलचे बील भरणे म्हणजे खूप कठीण होते. रुग्णालय प्रशासन बील भरल्याशिवाय समीरचे शव नातेवाइकांच्या ताब्यात देण्यास तयार नव्हते. मात्र अशावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांच्या दणक्याने रुग्णालय प्रशासनाला नमते घेण्यास भाग पाडले. आणि समीरचे शव त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात मिळाले. माजी आमदार डॉ. विनय नातू,ओबीसी मोर्चा रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचे वसई-विरारचे पदाधिकारी अशोक शेळके, जयेश डिगणकर, हेमंत भडवलकर, मनोज डाफळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. तळवली भेळेवाडीतील तरुणांनी देखील समीरसाठी खूप मेहनत घेतली.भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या या सामाजिक कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.