मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन लॉकडाऊन अंमलबजावणी करण्यात आली होती. काही जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागल्याने प्रशासनाने टप्प्या टप्प्यात राज्यात लागू असलेले नियम शिथिल करण्याचा निर्णय घेतला, असे होत असतानाच काही जिल्ह्यांमध्ये मात्र कोरोना रुग्ण संख्येचा लेख चढता होता. पण अखेर या चिंताजनक जिल्ह्यांमध्ये परिस्थिती सुधारत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
राज्यातील सातारा, पुणे, रायगड, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांमध्ये नियमांची अंमलबजावणी सक्तीने सुरू असतानाच अनलॉक नंतरच्या तिसऱ्या आठवड्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याचे आकडेवारी वरून समोर येत आहे. ही राज्यासाठी अत्यंत दिलासादायक बाब ठरत आहे.
