प्रमेय आर्यमाने यांची मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मागणी
गुहागर : ग्रामपंचायत स्ट्रीट लाईटच्या बिलासाठी १५ वा वित्त अयोगातून खर्च न करता त्यासाठी स्वतंत्र निधी शासनाने उपलब्ध करून द्यावा अशी मागणी सरपंच ग्राम संवाद संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमेय आर्यमाने यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी रत्नागिरी यांच्याकडे केली आहे.
District President of Sarpanch Gram Samvad Sanghatana Prameya Aryamane has demanded from the Chief Executive Officer Ratnagiri that the government should provide separate funds for the Gram Panchayat Street Light Bill without spending from the 15th Finance Commission.
यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, दि. २३ जुन २०२१ रोजी ग्रामविकास विभागाने शासन परिपत्रक क्रमांक-पंविआ-२०२१/प्रक्र-७१/वित्त-४, अन्वये १५ वा वित्त आयोगाच्या निधीतून स्ट्रीट लाईटचे बिल भरण्यास मान्यता देण्याचा जो शासन निर्णय घेतला आहे. त्या निर्णयाचा सर्व स्थरातून विरोध होत असून महाराष्ट्रातील अनेक छोट्या ग्रामपंचायतींना १५ वित्त आयोगाचा निधी हा फार कमी मिळतो. त्यामधूनच संगणक परीचालकाचे मानधन द्यावे लागते. मग आता पुन्हा त्यामधूनच जर स्ट्रीट लाईटचे बिल भरले तर गावाचा विकास करायचा कसा? काही गावांना १५ वित्त आयोग निधी ५ लाख मिळाला आहे तर विज बिल हे ९ लाख आले आहे ?
यासाठी आपणास या निवेदनाद्वारे सर्व सरपंचांच्या वतीने विनंती करण्यात येते की, ग्रामपंचायत स्ट्रीट लाईटचे विजबिल १५ वा वित्त आयोगातून देण्याचा जो शासन निर्णय घेण्यात आला आहे तो त्वरित मागे घेण्यात यावा तरच गावाचा विकास करणे शक्य होईल. तरी राज्य सरकारने स्ट्रीट लाईटचे विजबिल भरण्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करावी अशी मागणी त्यांनी यातून केली आहे.