६०० कुटुंबांवर ओढवणार बेरोजगारीचे संकट
गुहागर : भारतातील सर्वात मोठ्या रत्नागिरी गॅस आणि वीज निर्मिती प्रकल्पात अपूऱ्या गॅस पुरवठ्यामुळे केवळ २०० मेगावॅट वीज निर्मिती सुरु आहे. १९६४ मेगावॅटची क्षमता असलेल्या आरजीपीपीएलकडे मार्च २०२२ नंतर वीज खरेदीदार नसल्याने हा प्रकल्पाचे भविष्य अंधारमय आहे. परिणामी ६०० स्थानिक कुटुंबांवर बेरोजगारीचे संकट ओढवणार आहे. प्रकल्पात भागीदारी असलेल्या महाराष्ट्र शासनाने या प्रकल्पातून वीज घ्यावी यासाठी कंपनी व्यवस्थापन प्रयत्नशील आहे.
India’s largest Ratnagiri gas and power plant has started generating only 200 MW due to insufficient gas supply. To RGPPL with a capacity of 1964 MW The future of the project is bleak as there are no power buyers after March 2022. As a result, 600 local families will face unemployment crisis. The company management is trying to get power from the Maharashtra government, which is a partner in the project.
देशात उत्पादित होणाऱ्या नैसर्गिक वायुचा वापर प्राधान्याने खतनिर्मिती, घरगुती गॅस आणि वाहनांसाठी इंधन म्हणून केला जातो. त्यामुळे प्रतिदिन १९६४ मेगावॅट वीजनिर्मितीसाठी आवश्यक ८.५ एमएमएससीएमडी गॅस आरजीपीपीएलला मिळत नाही. भारतीय रेल्वेला ५०० मेगावॅट वीज देण्यासाठी आवश्यक गॅसही मिळत नसल्याने सध्या आरजीपीपीएल अन्य मार्गांनी हा करार पूर्ण करत आहे. मार्च २०२२ मध्ये हा करार संपल्यावर आरजीपीपीएलकडे वीजेचा खरेदीदारच नाही. वीज उत्पादन होत नसल्याने कंपनीचे भवितव्य अंधारात आहे.
नैसर्गिक गॅसवर आधारीत आरजीपीपीएलमध्ये कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण नगण्य आहे. उष्णता कमी प्रमाणात बाहेर पडते. अन्य वीज कंपन्यांच्या तुलनेत अत्यंत कमी जागेत प्रकल्प आहे. गॅसबरोबरच वाफेवर टर्बाईन चालविण्याचे तंत्र असलेला हा एकमेव प्रकल्प आहे. रेन हार्वेस्टिंगचे पाण्यावर प्रकल्प चालतो. ही वैशिष्ट्ये असलेला हा प्रकल्प बंद होणे हे देशाचे नुकसान आहे. आज प्रकल्पामध्ये गुहागर परिसरातील सुमारे ६०० स्थानिक कामगार आहेत. प्रकल्प बंद पडल्यास त्याचा परिणाम थेट या ६०० कुटुंबांवर होणार आहे. याशिवाय वाहन पुरवणारे, बांधकाम करणारे, कॉलनीमध्ये साफसफाई करणारे असे अनेक ठेकदारांचे व्यवसाय बंद होतील. त्यामुळे त्याची आर्थिक झळ थेट स्थानिकांना बसणार आहे.
भारतातील सर्वात मोठा, पर्यावरणपुरक, प्रदुषणविरहीत वीज प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालणे आवश्यक आहे. आम्ही अशा करतो की, केंद्र आणि राज्य सरकारबरोबरच कोकणातील लोकप्रतिनिधी यासाठी पुढे येथील. हा प्रकल्प पुर्ण क्षमतेने चालल्यास रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासाला मोठी चालना मिळेल.
-असीमकुमार सामंता, मुख्य कार्यकारी अधिकारी आरजीपीपीएल.