गुहागर : दिपावलीमध्ये किल्ले बनविणे ही प्रथा चिमुकल्यांसह तरुण वर्ग आजही तेवढ्याच आनंदाने आणि उत्साहाने जोपासत आहे. दिवाळी आणि किल्ले यांचे नाते फार वर्षापासून आहे. याच अनुषंगाने दरवर्षी दिवाळी सणात विविध किल्ले साकारले जातात. किल्ला बनविताना दरवाजे, किल्ल्यावरील मंदिरे, गुहा, टेहळणी बुरुज, छत्रपती शिवाजी महाराजांची बसण्याची जागा, पायथ्याचे गाव दाखविणे, गडावर बनविलेल्या मातीचे सुंदर चित्रे मांडणे, मावळे, तोफा, शिवरायांच्या मूर्तीची स्थापना करणे अशी प्रथा पूर्वांपर चालत आली आहे. सध्याच्या युगात तर तयार किल्लेही उपलब्ध होऊ लागले आहेत, परंतु दगड – माती पासून किल्ला बनविण्याची मजा काही वेगळीच असते. अशा प्रकारचे किल्ले गुहागर तालुक्यात असंख्य किल्ले प्रेमींनी आकर्षक किल्ले बनवले आहेत.
The tradition of building forts in Diwali is still practiced by the youth with the same joy and enthusiasm. The relationship between Diwali and the fort has been going on for many years. Due to this, various forts are constructed every year during Diwali.
गेल्या दोन वर्ष कोरोनामुळे महत्वाचे सणात सर्वानाच आनंद व्यक्त करता आला नाही. किल्ले बनविण्यासाठी बच्चे कंपनीला घरातील तरुण, ज्येष्ठांचे सहकार्य मिळत असते. किल्ले बनविणे ही आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे. राज्यात किल्ल्यांना एक आगळेवेगळे स्थान आहे. हे किल्ले त्या काळातील राजे, महाराजांनी केलेल्या पराक्रमाची साक्ष देतात. इतिहास कालीन पराक्रम आणि संघर्षाचे हे किल्ले प्रतीक आहेत. आजही अनेक कुटुंब दिवाळीच्या सुट्टीत अनेक किल्ल्यांना आवर्जून भेट देतात. त्यामुळे लहान मुलांना गड किल्ले काय होते, त्या काळात महाराष्ट्र कसा होता, राजे महाराजे कोण होते, याची माहिती मिळावी हा उद्देश असतो. पुस्तकात पाहिलेले किल्ले प्रत्यक्षात पाहताना एक वेगळीच मजा येते. किल्ला प्रत्यक्ष पहिला असेल तर किल्ला साकारणे अधिक सोपे जाते. किल्ले बनविण्याचा उद्देश केवळ मनोरंजन किंवा खेळ नसून त्यामुळे आपापल्या प्रयोगशीलतेला आणि कल्पकतेला वाट मिळते. त्या माध्यमातून अनेक नवनवीन संकल्पना सुचतात. दगड मातीचे किल्ले बनविण्यात खूप मजा असते. आणि यासाठी लागणारे साहित्य ही सहज मिळते. दिवाळी सणामध्ये साकारले जाणारे हे किल्ले सध्या अनेकांचे आकर्षण ठरत आहेत. लहान मुले दिवाळी अनोख्या पद्धतीने साजरी करत आहेत