गुहागर : कोविड प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या वतीने गृह विलगीकरण बंद करून संस्थात्मक विलगीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच २००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावात ग्राम विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात यावेत असे शासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्याला प्रतिसाद देत गुहागर तालुक्यातील आबलोली ग्रामपंचायतीच्या वतीने तयार करण्यात आलेल्या तालुक्यातील पहिल्या कोविड विलगीकरण कक्षाचे उद्घाटन सभापती पूर्वी निमुणकर यांच्या हस्ते करण्यात आले.
Institutional segregation has been made mandatory by the government by stopping home segregation to prevent covid infestation. Responding to the government’s request for setting up of a Village Separation Cell, the first Covid Separation Cell in the taluka, set up by Abloli Gram Panchayat in Guhagar taluka, was inaugurated by Chairman Purvi Nimunkar.
लोकशिक्षण मंडळ आबलोलीच्या खोडदे – गोणबरेवाडी येथील शैक्षणिक संकुलात १० बेडचे हे विलगीकरण कक्ष असून स्त्री-पुरुषांसाठी स्वतंत्र खोल्या आहेत. त्यासाठी लागणा-या वर्गखोल्या, वीज, पाणी, स्वच्छता गृह आदी पायाभूत सुविधांसह रुग्णांसाठी नाश्ता, जेवणाची सोय संस्थेच्या वतीने करण्यात येणार असल्याचे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन चंद्रकांत बाईत यांनी सांगितले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ.जी. पी. जांगीड व प्राथमिक आरोग्य केंद्र आबलोली चे वैद्यकीय अधिकारी डॉ.ए.एच. गावड यांनी बेड उपलब्ध करून दिले आहेत. तसेच आवश्यक आरोग्य सुविधा प्राथमिक आरोग्य केंद्र आबलोली यांच्या वतीने पुरविण्यात येणार आहेत. गावातच विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आल्याने रुग्णांवर आजाराचे दडपण राहणार नाही, ते औषधोपचारास चांगला प्रतिसाद देतील आणि बरे होऊन घरी जातील असा आशावाद व्यक्त करतानाच सभापती पूर्वी निमुणकर यांनी तालुक्यातील पहिले कोविड विलगीकरण कक्ष स्थापन करणा-या आबलोली ग्रामपंचायतीचे कौतुक केले.
यावेळी सभापती पूर्वी निमुणकर, लोक शिक्षण मंडळ आबलोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन बाईत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जी.पी. जांगीड, वैद्यकीय अधिकारी डॉ.ए.एच. गावड, सरपंच तुकाराम पागडे, ग्रामसेवक बी.बी.सुर्यवंशी, तलाठी आनंद काजरोळकर, पोलीस पाटील महेश भाटकर, ग्रामपंचायत सदस्य प्रमेय आर्यमाने, आशिष भोसले, पुजा कारेकर, मिनल कदम, मुग्धा पागडे, राजेंद्र कारेकर, अमोल पवार, संदेश कदम, कर्मचारी योगेश भोसले, अमोल शिर्के, प्रकाश बोडेकर, शंकर घाणेकर आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे ग्रामसेवक बी.बी. सुर्यवंशी यांनी आभार मानले.
गुहागर तालुक्यातील आबलोली ग्रामपंचायतीने पहिले कोविड विलगीकरण कक्ष स्थापन करण्याचा मान मिळवला आहे.गावातील रुग्णांवर गावातच प्राथमिक उपचार होणार आहेत.आमचे गाव कोरोनामुक्त गाव करण्याचा आमचा प्रयत्न आहे .या विलगीकरण कक्षाचा लाभ गावातील कोरोना रुग्णांना होणार आहे.
-तुकाराम पागडे, सरपंच आबलोली