• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वाशिष्ठी नदीवरील पूलाचा भराव वाहून गेला

by Ganesh Dhanawade
July 23, 2021
in Old News
17 0
0
वाशिष्ठी नदीवरील पूलाचा भराव वाहून गेला
33
SHARES
93
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई-गोवा हायवे बंद

चिपळूण : बहादूर शेख नाका येथील वाशिष्ठी नदीवरील (vashisthit river) धोकादायक पुलाचा भराव अखेर आज पहाटे वाहून गेल्याची घटना घडली. अतिवृष्टीमुळे (heavy rain) हा पुल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे सावित्री नदीवरील पुल कोसळल्यानंतर झालेल्या सारखी घटना घडली नाही. मुंबई गोवा महामार्गावरील हा ब्रिटीशकालीन महत्त्वाचा पूल होता. आज पहाटे पुलाचा काही भाग वाहून गेला आहे.
गेले दोन दिवस या पुलावरून पाच ते सहा फूट पाणी सतत वेगाने वाहत होते. हा पूल जुन्या काळातील ब्रिटिशकालीन होता. नवीन पुलाचे काम सुरू असल्यामुळे या पुलावरूनच सध्या मुंबई-गोवा (mumbai-goa highway) महामार्गावरील वाहतूक सुरू होती. आज पावसाचा जोर कमी झाल्यानंतर नदीच्या पाण्याचा जोरही कमी झाला. परंतु आज पहाटेच्या सुमाराला या पुलाचा काही भाग वाहून गेला. त्यामुळे पुलाचा भगदाड पडल्यासारखे दृश्य दिसून आले.
राष्ट्रीय महामार्ग विभागाने या पुलाला धोकादायक जाहीर केले होते. पुलाच्या दुरुस्तीसाठी विविध सामाजिक कार्यकर्त्यांकडून तसेच राजकीय नेत्यांकडून सतत पाठपुरावा सुरू होता. मात्र राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून पुलाच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आले. शेजारील नव्या पुलाचे काम सुरू आहे. तेही कासव गतीने सुरू आहे. त्यामुळे मुंबई – गोवा महामार्गावरील वाहतूकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आले.

Tags: Bahadur Sheikh Nakadangerous bridgeGuhagarGuhagar Newsheavy rainsMarathi Newsmumbai-goa highwayNews in GuhagarTrafficVashishti riverअतिवृष्टीटॉप न्युजताज्या बातम्याब्रिटिशकालीन पुलमराठी बातम्यामुंबई गोवा महामार्गराष्ट्रीय महामार्ग विभागलोकल न्युजवाशिष्ठी नदीसामाजिक कार्यकर्ते
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.