गुहागर, ता. 04 : तालुक्यातील गिमवी वरचीवाडी येथे नारळी पोफळीच्या बागेमधील विहीरीत पुरुषाचा मृतदेह आढळून आला. सदर मृतदेह अजय रामचंद्र जाधव (वय 45) रा. गिमवी वरचीवाडी यांचा आहे. सदर घटनेची खबर अजय जाधव यांची पत्नी अमृता जाधव हिने गुहागर पोलीसांना दिली.
अस्मिता अजय जाधव (वय 35) रा. गिमवी वरची वाडी यांनी पोलीसांना दिलेल्या माहितीनुसार अजय रामचंद्र जाधव याला दारु पिण्याचे व्यसन होते. तसेच ते अधुनमधून वेड्यासारखे करायचे. वेडाच्या लहरी आजारपणावर कोणत्याही दवाखान्यात औषधोपचार केला जात नव्हता. 3 नोव्हेंबरला रात्री 1 च्या दरम्यान ते घराबाहेर गेले. मात्र सकाळी सकाळी 6 वाजेपर्यंत ते आले नाहीत. म्हणून घरच्या मंडळींनी घराच्या आजुबाजुला अजय दिसतो काय याची पहाणी केली. तेव्हा घराचे पाठीमागील बाजूर असलेल्या नारळी पोफळीच्या बागेतील विहीरीत अजयचा मृतदेह आढळून आला.
वेडाच्या भरात अजय यांनीविहीरीत उडी मारली असावी असा संशय अस्मिता जाधव यांनी व्यक्त केला आहे. सदर घटनेची खबर मिळाल्यावर पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांनी ४ नोव्हेंबरला दुपारी 12.00 दरम्यान घटनास्थळाला भेट दिली. गुहागर पोलीसांनी अजय जाधव यांचा आकस्मिक मृत्यू झाल्याची नोंद केली आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल हनुमंत नलावडे करत आहेत.