आफ्रोहचे प्रसिद्धीप्रमुख गजेंद्र पौनीकर यांचा निर्धार
गुहागर : ऑर्गनायझेशन फाॅर राईट्स ऑफ ह्युमन, महाराष्ट्रच्या वतीने सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर 2 ऑक्टोबर पासून सुरू केलेल्या साखळी उपोषणाचा आठव्या दिवशी आफ्रोहचे राज्य कार्यकारिणी सदस्य व प्रसिद्धी प्रमुख तथा रत्नागिरी जिल्हाध्यक्ष गजेंद्र पौनीकर यांच्या सह रत्नागिरी आफ्रोहचे सचिव बापुराव रोडे, सभासद किशोर रोडे, सतीश घावट हे उपोषणाला बसले तर त्यांच्या समर्थनार्थ हेमराज सोनकुसरे,गजानन उमरेडकर, रामदास वडाळ,प्रणव वडाळ व महिला आघाडीच्या लता वढाळ यांनी हे आझाद मैदान, मुंबई येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणादरम्यान उपस्थित होते.
On the eighth day of the chain fast on October 2 at Azad Maidan in Mumbai for various demands of retired employees on behalf of the Organization for Human Rights, Maharashtra, Adi members along with Gajendra Paunikar of Afroh were present during the chain fast.
गेल्या दोन वर्षापासून या सेवानिवृत्त कर्मचा-यांना पेन्शन सुरू न झाल्यामुळे सेवानिवृत्त कर्मचारी संकटात सापडलेले आहेत. शासनाकडून सकारत्मक निर्णय होईपर्यंत किंवा संघटनेच्या प्रतिनिधीसोंबत सचिव स्तरावर बैठक होईपर्यंत हे साखळी उपोषण सुरूच राहणार असा निर्धार आफ्रोहचे प्रसिद्धीप्रमुख गजेंद्र पौनीकर यांनी व्यक्त केला.
या साखळी उपोषणात आता सेवानिवृत्त कर्मचा-यांबरोबरच सेवेत असलेल्या कर्मचारीही उपोषणासाठी सरसावले आहेत. साखळी उपोषणासाठी ठाणे जिल्हाशाखेचे अध्यक्ष दयानंद, महिला आघाडीचया सौ.प्रियाताई खापरे, राज्य कार्यकारिणी सदस्य नरेश खापरे कोळी, उपाध्यक्ष अर्जून मेस्त्री, नरेंद्र भिवापूरकर, घनश्याम हेडाऊ व इतर पदाधिकारी यासाठी प्रयत्नशिल आहेत.